Sun Nov 24 21:40:44 IST 2024
नागपूर : स्थानिक व्यावसायिकांना व्यवसाय करण्या करीता जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महा मेट्रो नागपूरने झिरो माईल फ्रिडम पार्क येथे मिनी इलेक्ट्रॉनिक मार्केट स्थापन करणार आहे. या करता या स्थानकावर एकूण २० दुकानांचे बांधकाम झाले आहे.
या दुकानाकरिता महा मेट्रोने निविदा काढल्या असून या अंतर्गत नऊ वर्षाकरिता भाडे पट्टी तत्वावर येथील जागा घेता येईल. एकूण २० दुकानांपैकी १७ दुकानांचे क्षेत्रफळ १२५ ते १५० चौरस फूट दरम्यान आहे. उर्वरित ३ दुकाने मोठ्या आकाराची असून त्या दुकानांचे क्षेत्रफळ ६०० ते ९०० चौरस फूट दरम्यान आहे. या दुकानांचे संबंधी संपूर्ण माहिती महा मेट्रोचे संकेत स्थळ - www.metrorailnagpur.com वरून घेता येईल. पुढील प्रक्रिया देखील याच संकेत स्थळावरून करायची आहे. या दुकानांकरता निविदा सादर करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२१ आहे. व्यावसायिकाने निविदे अंतर्गत सादर केलेल्या प्रति चौरस मीटर प्रति महिना लायसन्स शुल्काप्रमाणे दुकान वाटप होईल. सिव्हिल लाईन्स येथील झिरो माईल मेट्रो स्टेशन येथे २० मजली इमारतीच्या बांधकामाकरिता करता महा मेट्रोने निविदा काढली आहे. झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशन या इमारतीच्या आतच स्थापन असेल.
या २० मजली इमारतीत २ मजल्याचे बेसमेंट असेल आणि १८ मजले त्यावर असतील. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या स्थानकाच्या बांधकामाकरता एकूण २९५ फूट उंचीची मंजुरी दिली आहे. महा मेट्रोने पार्किंग-कम-कमर्शियल डेव्हलपमेंट थीम अंतर्गत या प्रकल्पाची कल्पना साकारली असून सदर प्रकल्प पीपीपी तत्वावर निर्माण केल्या जाणार आहे. कंत्राटदार या ठिकाणी २,९०,००० चौ. फूट पर्यंतचे व्यावसायिक जागा निर्माण करेल. या ठिकाणी पार्किंग करिता २ बेसमेंट असतील एक ग्राउंड लेव्हल आणि एकमेझेनिन लेव्हल जे कि महा मेट्रोने याआधिच निर्माण केले आहे. कंत्राटदाराला फक्त १३ मजली इमारतीचे निर्माण कार्य मेट्रो स्टेशनच्या वर करावे लागतील.