Thu Nov 21 23:35:15 IST 2024
नागपूर : शेतमालास बाजारात योग्य भाव न मिळाल्याने आम्ही केलेल्या मागणीमुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसुन कापुस व सोयाबीन उत्पादकांना १० हजार रुपयाची टुटपुंजी मदत जाहीर केली. परंतु यात ई-पिक पाहणीची अट लावल्यामुळे राज्यातील जवळपास ९० टक्के शेतकरी हे मदतीपासुन वंचीत राहणार आहे. ...
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक आणि दिंडोरीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पिंपळगाव बसवंत येथे आयोजित सभेत प्रेक्षकांमध्ये बसलेल्या शेतकऱ्यांनी 'मोदीजी आता कांद्यावर बोला' अशी घोषणाबाजी सुरु केल्याचे यावेळी पाहायला मिळाले....
मुंबई : स्कायमेट हवामान अहवालानुसार, आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे....
नाशिक : केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने सकाळपासून लासलगावसह जिल्ह्यातील विविध भागात कांदा लिलाव ठप्प झाले असून शेतकरी रस्त्यावर उतरल्याने चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर एक तासापेक्षा जास्त वेळ रास्ता रोको करण्यात आला. ...
नागपूर : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली....
मुंबई : राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार 99 हजार 381 हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, ...
मुंबई : राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार ...
बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा,देऊळगाव राजा, लोणार तालुक्यात रात्रीपासून अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.या नुकसानाची माहिती मिळताच खासदार प्रतापराव जाधव यांनी पहाटेच शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेत नुकसानीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या....
मुंबई : आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे पण या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली असून मुंबईत सरकारच्या दरबारात शेतकरी मदतीची वाट पहात आहे. केंद्र सरकारकडे २५०० कोटी रुपये मागितल्याचे अर्थमंत्री सांगत आहेत पण जाहीरबाजी व इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना ...
नाशिक : राज्यात आज नाशिकसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. याअगोदरच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली तर जिल्ह्यातील निफाड सिन्नर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली. अवकाळी पावसामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे....