Fri Nov 22 03:00:49 IST 2024
नागपूर : शिवशाही महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी महोत्सवात अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सुनील भाऊ केदार उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री डॉ.परिणय फुके तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे भोसले घराण्याचे युवराज जयसिंग राजे उपस्थित होते.
श्री.नरेद्र जिचकार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात शिव जयंती साजरी होते तशी विदर्भात मोठ्या उत्साहात साजरी होत नाही.ही खल अनेक वर्षे माझ्या मनात होती.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आपण गणेशोत्सव,दुर्गात्सव दहा दिवसांचा साजरा करतो तो करायलाच पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराज आपले कुलदैवत आहेत त्यामुळे महाराजांची जयंती सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरी व्हायला हवी म्हणून मी प्रण घेतला की शिव जयंती उत्सव सुध्दा दहा दिवस साजरी करायची.हे शिवशाही महोत्सवाचे दुसरे वर्ष पहिल्या वर्षी चार दिवस आणि या वर्षी सहा दिवस महोत्सव साजरा करणार. उद्घाटन करताना डॉ परिणय फुके म्हणाले की पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात खूप लढाया लढल्या गेल्या त्यामुळे तिकडे शिव जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते.विदर्भात तश्या लढाय्या लढल्या गेल्या नाही.
पण शिवशाही महोत्सव सारख्या आयोजनाने विदर्भात सुद्धा शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल.अध्यक्षीय भाषण करताना माजी मंत्री सुनील भाऊ केदार म्हणाले की महापुरूषांच्या जयंती फक्त साजरी करून होणार नाही.जो पर्यंत आपण महापुरूषांच्या विचारांना आपल्या आयुष्यात रूजवणार नाही तोपर्यंत काही ही बदल होणार नाही.युवा पीढीला महापुरूषांच्या विचार समजावून सांगण्याची जबाबदारी आपली आहे.शिवशाही महोत्सवाने ही जबाबदारी घेतली याचा मला आनंद आहे. महोत्सवात दुपारी साडे चार वाजता दिपाली घोंगे यांनी राजमाता जिजाऊ हे एकपात्री नाटक सादर करून जिजाऊचे चरित्र उभे केले.त्यानंतर नितीन बानगुडे पाटील यांनी शिव चरित्रावर व्याख्यान दिले.नितिन बानगुडे पाटील यांनी शिव चरित्र उभे करताना महाराजांनी कसे सर्वश्रेष्ठ स्वराज्य निर्माण केले याचे कथन केले.शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास अत्यंत अभ्यासपूर्ण, भावनिकपणे उभा केला.छत्रपती संभाजी नगर येथील शिवशाहीर सुरेश जाधव यांनी विररसातील पोवाडे गायले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.शिवशाही महोत्सवाला जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला.