Fri Nov 22 04:08:51 IST 2024
नागपूर : कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान येत आहे, पण हे तंत्रज्ञान शेतकèयांना समजणारे, परवडणारे आणि त्यांच्या हिताचे असावे व त्याशिवाय ते सुलभ देखील असावे असा सूर कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन विषय चर्चासत्रातील वक्त्यांच्या भाषणातून व्यक्त झाला.
मध्यभारतातील सर्वात मोठ्या अॅग्रो व्हिजन या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या तिसèया दिवशी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान व मूल्यवर्धन या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यात वेदचे देवेंद्र पारेख, डॉ. शशिकांत चौधरी, सुजीत सहगल, पंकृविचे कुलगुरु डॉ. भाले, देविका बजाज, यवतमाळ येथील ग्रामहित प्रकल्पाच्या श्वेता ठाकरे, विकास झा, सचिन सुरी, अंकुर सीड्सचे वैभव पात्रीकर सहभागी झाले होते. प्रारंभी सुजीत सहगल यांनी, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आले पण सध्या त्याचा अधिक वापर होताना दिसत नाही, तंत्रज्ञान अधिक वाढल्यास युवापीठीला आकर्षित करणे शक्य होईल व शेतीपासून दूर गेलेली तरुणाई कृषीकडे वळेल असे मत व्यक्त नागपूरच्या उद्योजिका देविका बजाज यांनी, आपल्या वक्तव्यात मुंगन्याच्या (मोरींगा) शेंगा व त्याच्या झाडापासून असणारे औषधी गुणधर्म आदींची माहिती दिली तसेच मुंगन्याच्या झाडाची पाने, फुले, फळे, शाखा, खोड यांचे आयुर्वेदातील महत्त्व विशद केले. ग्रामहित प्रकल्पाच्या श्वेता ठाकरे यांनी, आमच्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या अधिक होत होत्या, त्याची कारणे शोधली, त्यात कर्ज न मिळणे, पैसा हाती नसणे, साठवणुकीच्या सोयी नसणे आदी बाबी पुढे आल्या. त्यावर उपाय म्हणून ग्रामहितने एक व्यासपीठ उभे केले आणि शेतकèयांना येणाèया अडचणींवर मात करुन दिलासा दिल्याचे सांगितले. या चर्चासत्रात विकास झा यांनी सेंद्रीय शेती विषयक मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ. शशिकांत चौधरी यांनी, शेतकèयांनी पारंपरिक पद्धतीने शेती करण्याची मानसिकता बाजूला ठेऊन शेतकèयांमध्ये या तंत्राविषयी जागृती करावी लागेल. विशेष म्हणजे विकसित देशाचे तंत्रज्ञान याठिकाणी वापरता येणार नाही, भारतासाठी स्थानिक तंत्रज्ञान विकसित करावे लागेल असे सांगितले. यावेळी क्रॉपडाटाचे अध्यक्ष सचिन सुरी यांनी, आम्ही सॅटेलाईटच्या माध्यमातून शेतीची पूर्ण पाहणी व तपासणी करुन डाटा तयार करतो. आणि अतिशय पारदर्शी पद्धतीने माहितीचे संकलन करतो असे सांगितले. समारोप डॉ. भाले यांच्या भाषणाने झाला. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह भेटीदाखल देण्यात आले.