अखेर 'स्वाभिमानी'च्या मागण्या मान्य, ऊस दर आंदोलन

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-11-23 21:17:02.0
img

कोल्हापूर : गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी ३ हजार पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी टनास १०० रुपये आणि ज्यांनी ३ हजार रुपये दिले आहेत त्यांनी किमान आणखी ५० रुपये देण्यास जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस दराबाबत सुरू असलेली कोंडी फुटली. यासाठी स्वाभिमानी संघटनेने गुरुवार सकाळपासून पुणे-बेंगळुरू महामार्गावरील चक्काजाम आंदोलन केले होते.

हे आंदोलन देखील ९ तासानंतर मागे घेण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य करम्यात आल्या. पुढील दोन महिन्यात याला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता देण्यात येणार असल्याचे या बैठकीनंतर सांगण्यात आले. या संदर्भात सर्व जोपर्यंत सर्व साखर कारखानदार पत्र काढत नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही असे, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

गेल्या आठ तासापासून सुरू असलेल्या राजू शेट्टी यांच्या राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन अखेर मागणी मान्य झाल्यानंतर अखेर थांबवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी मागणी मान्य केल्याने राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले. मागील हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजारांच्या आतमध्ये दर दिला आहे त्यांनी १०० रुपये तर ३ हजार पेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील ५० रुपये देण्याचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आलाय. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर दोन महिन्यानंतर यश आल्याने फटाके फोडून आणि राजू शेट्टी यांच्यावर फुलांची आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरी करण्यात आला आहे.तर यापुढे आपला मोर्चा सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे वळवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

Related Post