Fri Apr 04 07:00:07 IST 2025
नागपूर : विदर्भातील शेतक-यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणा-या बाराव्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीचा आज, 27 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता समारोप होत आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात होणा-या या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री व अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी राहतील.
मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे राहणार आहेत. मध्यप्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल, आसामचे कृषी मंत्री अतुल बोरा, महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रेशीमबाग मैदानात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या कृषी प्रदर्शनाला शेतकरी बांधव, उत्पादक, उद्योजक, विशेषज्ञ, देशभरातील नामांकित कंपन्या, संस्था, बँका, वितरक, शासकीय कंपन्या इत्यादींचा सहभाग लाभला.
शेतक-यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यशाळा, दुग्ध व्यवसाय विकास परिषद, कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानव व मूल्यवर्धन विषयावर परिषदांचा त्यांनी लाभ घेतला. शेतकरी बांधवांनी नवनवीन तंत्रांची माहिती करून घेतली आणि पशु दालनालाही भेट दिली.