Fri Nov 22 04:02:25 IST 2024
नागपूर : कृषी प्रधान देश असल्याने धोरणे त्या पद्धतीने तयार होत आहेत.केंद्र शासन मुलभूत सोयींमध्ये गुंतवणूक करीत आहे पण कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीची आवश्यकता आहे, त्यातून कृषी क्षेत्रात समृद्धी साधता येईल असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्यक्त केले.
मध्यभारतातील सर्वात मोठ्या अॅग्रो व्हीजन २०२१ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन आज कृषी मंत्री तोमर यांच्या हस्ते भट सभागृहात झाले. याप्रसंगी प्रदर्शनाचे प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कर्नाटकचे तंत्रज्ञान मंत्री अश्वत्थ नारायण, महापौर दयाशंकर तिवारी, खा. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, नवनिर्वाचित आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, माजी मंत्री अनिल बोंडे, माजी आ. पाशा पटेल, डॉ. पातुरकर, सचिव संजय अग्रवाल, प्रदर्शनाचे सचिव रवी बोरटकर, डॉ. सी. डी. मायी, गिरीश गांधी, सहसचिव रमेश मानकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना तोमर यांनी, स्वातंत्र्यानंतर कृषी क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज आहे, कृषी क्षेत्रातील असंतुलन दूर करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने या क्षेत्रातील असंतुलन दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकèयांना आवश्यक माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून केले जाते. याचा फायदा देशातील शेतकèयांना देखील होत आहे. यंदा तेलबियांच्या लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, २८ लाख हेक्टर क्षेत्रात पाम तेल तयार होणाèया पिकाची लागवड तर उत्तर पूर्व भारतात ९ लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड करण्यात आली आहे. कृषी क्षेत्र हा देशाचा पाठीचा कणा आहे. हा कणा मजबूत असला तर देश मजबूत होईल, असेही तोमर यांनी सांगितले. पंतप्रधान किसान योजनेत १.६२ लाख कोटी रुपये शेतकèयांच्या खात्यात सरळ जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून शेतकèयांसाठी आधारभूत किमतीत वाढ केली असल्याचे सांगितले.
नवनवीन संशोधन, माहिती व आधुनिक तंत्रज्ञान शेतकèयांपर्यंत पोहोचले तर देशातील शेतकरी सुखी, संपन्न व शक्तिशाली होईल. हेच काम अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून केले जात असे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. १३ वर्षाचा या प्रदर्शनीचा इतिहास आहे. ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्या पूर्णत्वाकडे जात आहेत. ३ लाख शेतकèयांना ४० कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून ज्या शेतकèयाना प्रशिक्षण दिले जाते, त्याचा फायदा शेतकèयांना होतो आहे. शेतकरी हा लाखोपती व्हावा हे आपले स्वप्न आहे, ज्ञान, विज्ञान, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाशी शेतकरी जोडला जात आहे. ज्ञान ही शक्ती आहे. याचा उपयोग करून शेतकरी आता अन्नदाताच नव्हे तर ऊर्जा दाताही झाला पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न आहेत. ऊसापासून इथेनॉल, तणस, कचरा, यापासून सीएनजी शेतकर्याने बनवला आहे. इथेनॉलवर सर्व वाहने चालत आहे. इथेनॉलचे पंपही सुरु होत आहे. वाहनांना इथेनॉल व पेट्रोलवर चालणारे फ्लेक्स इंजिन लावले जाणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा प्रश्न संपणार आहे. आज ४ हजार कोटी लिटर इथेनॉलची देशाला गरज आहे, असेही गडकरी म्हणाले. शेतकèयांनी आता ड्रोनच्या साह्याने पिकावर फवारणी करावी असे सांगताना ना. गडकरी म्हणाले, ड्रोनला आता लिथियम ऑयन बॅटरीची गरज नाही. फ्लेक्स इंजिन लावून इथेनॉलवरही ड्रोन चालवता येते. तसेच नॅनो युरियाचा उपयोग शेतकèयांनी करावा. बांबूपासून इंधन निर्मितीसाठी शेतकर्यांनी बांबूची लागवड करावी. खडकाळ जमिनीवर बांबू लागवड शक्य आहे. बांबूपासून इथेनॉल निर्मिती झाली आहे. ट्रॅक्टर आता सीएनजीवर चालविणे यशस्वी झाले आहे. यामुळे शेतकर्याला वर्षाकाठी इंधनात १ ते सव्वा लाख रुपये बचत होणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. गडकरींचे नेतृत्व विदर्भाचे भाग्य कृषीमंत्र्यांकडून गडकरींचे विशेष कौतुक. बहुआयामी व दूरदृष्टी असलेले नेतृत्व अशा शब्दात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ना. नितीन गडकरी यांचे कौतुक केले. गडकरींसारखे नेतृत्व या भागाला लाभले हे विदर्भाचे भाग्य आहे. ना. गडकरी यांनी नवनवीन प्रयोगांमधून व तंत्रज्ञानाच्या साह्याने कृषी क्षेत्राची व शेतकर्यांची प्रगती साधण्याचे प्रयत्न केले आहे. या माध्यमातून उपासमार, बेरोजगारी व गरिबी हटविण्याचे प्रयत्न ना.गडकरी यांनी केले आहे. अॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून शेतकèयाना योग्य मार्गदर्शन आणिसंशोधन व तंत्रज्ञानाची मदत होत असल्याचेही तोमर यांनी सांगितले.