Sun Nov 24 23:47:19 IST 2024
नागपूर : केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ऍग्रोस्पेक्ट्रम या मासिक नियतकालिकाच्या १२ व्या ऍग्रोविजन च्या निमित्ताने काढलेल्या अंकाचे प्रकाशन केले. ऍग्रोस्पेक्ट्रम च्या ह्या अंकात शेती उद्योगातील नविन प्रवाह तसेच शेती पुरवठा शृंखला, कृषी रसायन उद्योग, खत, दुग्धोत्पादन उद्योग आणि बियाणे उद्योगातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती प्रकाशित केलेली आहे.
त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक पशुपालन उद्योग व कार्बन शेती या सारख्या नवीन क्षेत्रांचीही माहिती देण्यात आली आहे. कृषी उद्योगातील अग्रणी तसेच तज्ञांची भारतीय कृषी उद्योगाच्या पुढील वाटचाली बाबतची मतेही ऍग्रोस्पेक्ट्रम च्या अंकात मांडलेली आहेत. त्याचप्रमाणे २०२२ मध्ये कृषी उद्योगात उपलब्ध होणाऱ्या कृषी तंत्रज्ञानाची अद्यवायत माहितीही देण्यात आली आहे. ऍग्रोस्पेक्ट्म या मासिक B2B नियतकालिकाच्या १२ व्या एग्रोव्हिजन निमित्ताने काढलेल्या अंकाचे प्रकाशन केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते एग्रोव्हिजन कार्यक्रमात करण्यात आले. ह्या प्रकाशन समारंभात ऍग्रोव्हिजन चे प्रणेते श्री नितिन गडकरी, केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री, डॉ सी डी मायी, ऍग्रोस्पेक्ट्रम सल्लागार व चेअरमन सल्लागार समिती, ऍग्रोविजन आणि श्री रवींद्र बोरटकर, ऍग्रोस्पेक्ट्रम मासिकाचे प्रकाशक व सचिव, ऍग्रोविजन उपस्थित होते. ऍग्रोस्पेक्ट्रम चा जानेवारी २०२२ चा अंक शेती उद्योगाची २०२२ मधील पुढील संभाव्य वाटचाल ह्या विषयावर आधारीत आहे. शुक्रवारी प्रकाशित झालेला ऍग्रोस्पेक्ट्रम अंकामध्ये शेती उद्योगातील नविन प्रवाह तसेच शेती पुरवठा शृंखला, कृषी रसायन उद्योग, खत, दुग्धोत्पादन उद्योग आणि बियाणे उद्योगातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक पशुपालन उद्योग व कार्बन शेती या सारख्या नवीन क्षेत्रांचीही माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे २०२२ मध्ये कृषी उद्योगात उपलब्ध होणाऱ्या कृषी तंत्रज्ञानाची अद्यवायत माहितीही देण्यात आली आहे.
या अंकातील तज्ज्ञांच्या लेखांमधून कृषी तंत्रज्ञानाच्या मदतीने जगातील पहिल्या पाच कृषी निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होऊ शकतो असे मत मांडण्यात आले आहे. तसेच, भारताची कृषी निर्यात २०२१मध्ये ४१.२५ बिलियन डॉलर्स इतकी झालेली असल्याची माहिती ही देण्यात आली आहे. २०२२-२३ ह्या आर्थिक वर्षात रू. ४,१९,३४० कोटी करण्याचे उद्दिष्ट्य सरकारने ठेवले आहे तसेच २०२४-२५ पर्यंत मत्स्य निर्यात रू. १ लाख कोटीपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असल्याची माहितीही लेखकांनी दिली आहे. येत्या आर्थिक वर्षात भारतीय कृषी उद्योगाला अधिक चालना मिळेल तसेच कृषी सिंचन, कृषी वेअर हौसिंग उद्योग, कृषी शीतगृह ह्या मध्ये मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. कृषी उद्योग अग्रणींनी केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दलच्या आपल्या अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.