Fri Nov 22 04:18:53 IST 2024
नागपूर : शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीतून बाहेर निघून तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यासाठी अॅग्रो व्हिजन आणि स्वतः मी सहकार्य करणार असून शेतकऱ्यांना अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता बनविणार, अशी ग्वाही केंद्रीय सडक परिवहनमंत्री व अॅग्रो व्हीजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी दिली.
नागपूरच्या रेशीमबाग मैदान येथे आयोजित अॅग्रो व्हिजन कृषी संमेलनाचे उद्घाटन गुरुवारी २४ डिसेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन गडकरी बोलत होते. उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर, कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्वनाथ नारायण, खा. विकास महात्मे, आ. चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश गांधी आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, "शेतक-यांनी ज्ञान प्राप्त कराव. यामुळे उत्पादन वाढेल. आणि तो कर्जबाजारीपासून मुक्त होईल. साखर ही विदेशात निर्यात केली जात आहे. तसेच ऊसापासून इथनॉल बनविणे सुरू आहे. पेट्रोला इथनॉल हा पर्याय आहे. त्यामुळे पेट्रोलसाठी विदेशात जाणारा निधी हा देशात राहील." बायोइथनॉलवर चालणारे वाहन हे शेतकऱ्यांच्या मुलांनी चालवावे. लवकरच इथनॉलवर वाहने येणार असून लवकरच इथनॉल पंप सुरु होणार आहे, असेही गडकरी म्हणाले. ड्रोननी आता शेतमालावर औषध फवारणी करणे सुरु आहे. सहा लाखांचा ड्रोन हा आता दीड लाखात मिळत आहे. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ड्रोनचा वापर करावा. शेतकऱ्यांना नॅनो युरीया, नॅनो खते आदी हे मिळणार आहे. ही खते कमी लागणार असून शेतकऱ्यांनी ती वापरावे. केंद्र सरकार यासाठी पुढाकार घेतं आहे. नैसर्निक शेतीकडेही लक्ष देण गरजेचं आहे, असे गडकरी म्हणाले. सीएनजी व एलएनजी सोबत इलेक्ट्रीकवर चालणार ट्रॅक्टर ही मी आणणार आहे, असेही गडकरी म्हणाले. बांबूचे विविध उत्पादन घेण सुरू आहे. आसाममध्ये लवकरचं बांबुपासून सेकंड इथनॉलचा प्लॉट सुरू होणार आहे. ग्रीन हायड्रोजन वाहन येत आहे. ग्रीन हायड्रोजनची निर्मिती ही लवकरच सुरु होणार आहे. हल्ली गाय ही दोन लिटर दूध देते. आता ती २५ लिटर देणार आहे. इजराईलमधून काही गायी आणल्या आहेत. आहे. यासाठी उपयोग होणार आहे, असेही गडकरी म्हणाले. विदर्भचा कापूस विदेशात जातो. त्यासाठी लाखोंचा खर्च होता. आता वर्धेजवळ सिंधित पोर्ट सुरु केला आहे. या पोर्टातून कापूस हा विदेशात जाणार आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, असेही नितीन गडकरी म्हणाले.
नरेंद्रसिंग तोमर म्हणाले, "शेतीक्षेत्रात विज्ञान, नवीन टेन्कोलॉजी आदीची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हा या तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहे. त्यामुळे तो पुढे आहे. आज भारत हा अन्नधान्यात परिपूर्ण आहे. कृषीक्षेत्र हे व्यापक आहे. कृषीक्षेत्रात फार कमी निवेश आहे. इतर क्षेत्रात निवेश झाल्यानं ते क्षेत्र रोजगार व इतर क्षेत्रात पुढ गेलं. कृषी मध्ये निवेश नसल्यानं ते माघारल आहे. खेड्यात तंत्रज्ञ नाही. कोल्डस्टोरेज नाही. शेतकऱ्यांना अडचणींना समोरे जावं लागते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांसाठी विविध काम केली जात आहे. शेतकऱ्यांना याचा लाभही देण्यात येत आहे. कृषी उत्पादकमध्ये भारत हा आज मोठा निर्यातदार झाला आहे. केमिकल फर्टिलायजरचा दुष्परिणाम होतो. नॅनो युरिया व नैसर्गिक शेतीकडे शेतकत्यांनी वळावे, असेही तोमर म्हणाले. रवी बोरटकर यांनी कार्यक्रमाचं संचालन तर रमेश मानकर यांनी आभार मानले.