भारतीय शेतीचे भविष्य अनुभवा 'अॅग्रोव्हिजन'मध्ये, २४ नोव्हेंबरला होणार उद्घाटन

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-11-22 16:31:00.0
img

नागपूर : विदर्भातील शेतकन्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्यांची माहिती व्हावी त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूने, केंद्रिय मंत्री निलीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन येत्या २४ नोव्हेंबर पासून पीडीकेव्ही, दाभा मैदानावर सुरू होत आहे. राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, शेतकयांसाठी कार्यशाळा,

एकदिवसीय परिषदा असे स्वरूप असणाऱ्या अॅग्रोव्हिजनची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे शेतकरी, शेली तज्ज्ञ, कृषी प्रेमी अशा एकूणच मांदियाळीसाठी १०८०० चौरस मीटर जागेवर प्रदर्शनाचे डोग, गोठ्या उपकरणांसाठी ४५०० चौरस मीटरचे ओपन हँगर उभारण्यात आले असून कार्यशाळांसाठी तीन हॉल्स, उद्‌द्घाटनासाठी व परिषदेसाठी खास होम असा एकंदर १३००० चौरस मीटर परिसर प्रदर्शनाने व्याप्त आहे. शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीसाठी ३ काउंटर्स तयार करण्यात आले आहेत. पीडीकेव्ही, दाभा मैदानावर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू होत असलेल्या अॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सुमारे ४२५ स्टॉल्स कृषी प्रदर्शनात असतील. शेतक-यांसाठी बियाणे, खते, कृषी विषयक उपकरणे, आधुनिक कृषी उपकरणांची माहिती देणारे स्टॉल्स, नाबार्डसह एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, येस बैंक, इंडियन बैंक या बँक्स आणि कृषी विषयक सरकारी विभागांचा अॅग्रोव्हिजनमध्ये समावेश असणार आहे, यावी युपीएल, ई-व्हर्स, एआय, जेसीबी, राल्फार गिल्स, पतंजली, पीआय इंडस्ट्रिज, महिको, आयटीसी, अंकुर सिड्स, पारडा केमिकल्स, इंडियन इन्युनॉलॉजिकल्स लि., रासी सिड्स, व्ही.एच. ग्रुप, पारिजात इंडस्ट्रिज, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन, कुबोटा, टेफे अशा अनेक गोठ्या संस्थांनी प्रदर्शनात आपला सहभाग निश्चित केला आहे. याशिवाय गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांनीही आपला सहभाग प्रदर्शनात निश्चित केला आहे. या वर्षी अॅग्रोव्हिजन परिषदामध्ये ३१ विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत. देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि यशस्वी शेतकयांच्या यशोगाथांपासून प्रेरणा घेण्याची संधी यातून शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा अनेक विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत, यातील काही कार्यशाळा या जारत कालावधीच्या असतील, कृषी क्षेत्रात ड्रोनचा उपयोग, पुलशेती, भाजीपाला बियाणे उत्पादन, हळद आणि आले लागवड आणि प्रक्रिया, बांबू लागवड, औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान, दुधी रसायनांचा योग्य वापर, व्हर्टर्टीकल फागींग, रेशीम सेती, शेळी-मेंढी पालन, मधमाशी पालन, संदिश सेती, विदर्भातील ऑरोदुरिझमच्या संधी, विदर्भातील कुक्कुटपालन, उत्पादन संधी आणि आव्हाने अशा अनेक विषयांचा समावेश आहे.

यावर्षी अॅग्रोव्हिजनमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग: संधी व आव्हाने या विषयांवर २ दिवसाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या एलआयटी अल्युमिनी असोसिएशनच्या सहयोगाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या शिवाय यावर्षी अॅग्रोव्हिजनमध्ये काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विदर्भात डेअरीचा विकास २४ नोव्हेंबर रोजी ऊस उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळा २५ नोव्हेंबर रोजी, संत्रा लागवड व निर्यात संधी २६ नोव्हेंबरला, एफपीओ फॉर्मेशन मार्गदर्शन कार्यक्रम २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २.०० वाजता, महिला बचतगट मेळावा २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता, विदर्भात गोडयाापाण्यातील मत्सव्यवसायाच्या संधी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती या मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुरूवात होईल. अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक आणि केंद्रिय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेतील उ‌द्घाटन सोहळ्याला गुजरातचे राज्यपाल मा. श्री. आचार्य देवव्रत उद्घाटक म्हणून तर केंद्रिय मंत्री दुग्ध, मत्स व्यवसाय व पशुसंवर्धन मा.ना. श्री. परषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस, मा.ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री, महाराष्ट्र, मा.ना. श्री. धनंजय मुंडे, कृषी मंत्री, महाराष्ट्र व डॉ. मीनेश शहा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेत आयोजन सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर, यांच्यासह अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, अॅग्रोव्हिजन फाउंडेशन चे सदस्य श्री सुधीर दिवे, यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकरी, उत्पादक, ग्राहक, कृषी विद्यार्थी आणि कृषीप्रेमी अशा प्रत्येकाने या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी तसेच शेतकऱ्यांनी कार्यशाळा व परिषदांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related Post