Fri Nov 22 04:40:53 IST 2024
नागपूर : मध्यभारतातील व आता तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या अॅग्रो व्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनासाठी बाराव्या वर्षी अतिशय सुंदर लेआऊटसह प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्यामुळे आगामी चार दिवसात येणाèया शेतकèयांसाठी व नागरिकांसाठी अधिक सुसह्य होणार आहे.
स्थानिक रेशीमबाग मैदानात २४ ते २७ डिसेंबर दरम्यान आयोजित या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात ३५० दालने, कृषी प्रदर्शनाचे ६ कार्यशाळा तसेच कृषी कार्यशाळेचे २ दालन उभारण्यात आले असून या वर्षीच्या कृषी प्रदर्शनाची संकल्पना समृद्ध शेतीसाठी नवे तंत्रज्ञानङ्क अशी आहे. या प्रदर्शनात, विदर्भात डेअरी उद्योगाचा विकास, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन राष्ट्रीय अशा विविध विषयावर परिसंवाद तसेच परिषद होणार आहे. शेतकèयांसाठी कार्यशाळा, दुग्धव्यवसाय विकास परिषद चार दिवसीय प्रदर्शनामध्ये होईल. सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन जनतेकरीता रेशीमबाग मैदान येथे खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचा फेरफटका मारला असता, अतिशय मोहक वातावरण याठिकाणी जाणवत होते. मोकळे वातावरण आणि सुरेश आयोजन हेच यावर्षीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यावर्षी प्रदर्शनातील कार्यक्रमांचे मुख्य व्यासपीठ रेशीमबाग मैदानावर नसल्याने व सर्व मुख्य कार्यक्रम आणि चर्चासत्र सुरेश भट सभागृहात होत असल्याने होणारी गर्दी अतिशय सुरळीतपणे मार्गक्रमण करु शकेल अशी स्थिती आहे. मुख्य म्हणजे भट सभागृहात सुरू असलेले कार्यक्रम आणि चर्चासत्र ऐकता व पाहता यावे यासाठी रेशीमबाग मैदानात भव्य स्क्रीन लावण्यात आला असून सभागृहात न जाता प्रदर्शनीचा आनंद घेताना चर्चासत्र देखील ऐकता येते. मुख्य म्हणजे रेशीमबाग मैदानातून भट सभागृहाकडे जाण्यासाठी आजवर मुख्य रस्त्यावर यावे लागत होते यावर्षी सभागृहातून थेट मैदानात येणाèयासाठी मार्गव्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शनातील स्टॉल्ससाठी एकूण सहा डोम उभारण्यात आले आहे व या स्टॉल्समध्ये बांबू डेव्हलपमेंट बोर्ड, मदर डेअरी, केंद्रीय कृषी मंत्रालय, ड्रोनचा आविष्कार करणारे धानुका अॅग्रीटेक, महाराष्ट्र शासनाची महानंद डेअरी, आरे, वारणा, डाकविभाग, हॅन्डलूम कार्पोरेशन, प्रवीण मसाले, सुरुची मसाले, बांबू डेव्हलपमेंट बोर्ड, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट, कापुस अनुसंधान केंद्र, qलबूवर्गीय फळ संशोधन प्रकल्प, भुजल सर्वेक्षण विभाग, रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मqहद्रा ट्रॅक्टर्स, जेसीबी, युपीकॉन, पूर्ती qसचन समृद्धी प्रकल्प आदी महत्वपूर्ण संस्था आणि कंपन्यांचे स्टॉल्स आहेत.
यासोबत डोममधील स्टॉल्सची रचना देखील अतिशय कल्पकपणे करण्यात आली आहे. एका डोममध्ये खते, किटकनाशके, फवारणी साहित्य, रासायनिक औषधे, त्यात आलेले नवे तंत्रज्ञान तसेच उपकरणांचे प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येत आहे. याठिकाणी शेतकरी आणि तरुण वर्ग नव्या संकल्पना जाणून घेण्यासाठी उत्सुक असून आगामी तीन दिवसात याठिकाणी आणखी गर्दी वाढणार आहे. ओपन हँगरची मजा प्रदर्शनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येणाèया प्रत्येकाचे तापमान घेण्यात येते, त्यानंतर त्याचे नाव व विभाग आदींची विचारणा करुन त्यागटातील ओळखपत्र त्यांना देण्यात येते व त्यानंतरच आत प्रवेश देण्यात येतो. प्रवेश घेतल्यानंतर आत प्रवेश करताच ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके देण्यासाठी चार ड्रोन ठेवण्यात आले असून विशिष्ट अंतराने प्रात्यक्षिक देण्यात येते, त्यामुळे या स्टॉल्सचे विशेष आकर्षण आहे. यासोबतच अजस्त्र ट्रॅक्टर, जेसीबी मशीन, रोटावेटर, यांत्रिक मळणी यंत्र, नव्या पद्धतीची वाहने आदींचे स्टॉल्स अतिशय देखणे आहेत. पशुधन दालन मुख्य आकर्षण पशुधन दालन मागील पाच वर्षापासून या प्रदर्शनात असते, पण यावर्षी बकèया, गायी, म्हशी, वळू, मासे, कोंबड्या, कडकनाथ, qझगे, आकर्षण व नव्या वाणाच्या बैलजोड्यांसह नव्या अॅम्ब्रिओ तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आलेल्या २५ लिटर दूध देणाèया टेस्ट ट्युब गोèह्या प्रत्यक्ष पाहता येतील. ब्राझील मधील वळूचे विर्य वापरुन नव्या तंत्रज्ञानातून कृत्रिम रेतन पद्धतीने विकसित केलेल्या या गीर गायी कृषी प्रेमींना प्रत्यक्ष पाहता येणार आहेत.