प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातात? : राज ठाकरे

jitendra.dhabarde@gmail.com 2022-10-31 21:36:27.0
img

मुंबई : वाईट या गोष्टीचं वाटतं जो प्रकल्प महाराष्ट्रात येतोय आणि जो बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय. म्हणूनच पंतप्रधानांनी स्वत: याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे. पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. आणि तो संपूर्ण देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे.

प्रत्येक राज्यात उद्योग धंदे आले पाहिजेत. तिथल्या लोकांना तिथून आपलं घर सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याची आणि तिकच्या लोकांना त्यांचं ओझं बनण्याची आवश्यकता नाही. असे प्रकल्प समजा प्रत्येक राज्यात गेले, तर देशाचाच विकास होईल, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रकल्पांसाठी ज्या सवलती आणि प्रशासकीय सुविधा आहेत त्यांच्यासाठी फक्त गुजरातमध्येच पायाभूत सुविधा आहेत असं नाही. तामिळनाडू, कर्नाटकात आहे आणि इतर राज्यातही आहे. अजूनही महाराष्ट्र हे राज्य उद्योगधंद्याच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पुढे आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

Related Post