शाहरुख खानला कस्टम्सने ठोठावला 7 लाखांचा दंड

jitendra.dhabarde@gmail.com 2022-11-12 22:59:44.0
img

मुंबई : विमानतळावर कस्टम्स अधिकाऱ्यांनी शाहरुखला अडवलं. चौकशीदरम्यान शाहरुखकडे महागड्या घड्याळांचा संच आढळला. या सगळ्या घड्याळ्यांची किंमत 18 लाख रुपये होती. याकारणापायी शाहरुखला 6.83 लाख रुपयांची कस्ट्म्स ड्युटी भरावी लागली.

शाहरुखच्या बॅगेत बाबुन अँड जुर्बक, रोलेक्सची सहा घड्याळ्यांचे 6 डबे, स्पिरीट ब्रँडची घड्याळं, अपल सीरिजची घड्याळं होती. घड्याळ्यांचे रिकामे बॉक्सही होते. विमानतळावर खूप वेळ यासंदर्भातील कारवाई सुरू होती. कारवाई पूर्ण झाल्यावर शाहरुख खान आणि व्यवस्थापक पूजा ददलानी यांना जाऊ देण्यात आलं.

शाहरुखचे बॉडीगार्ड रवी आणि बाकी सदस्यांना रोखण्यात आलं. शाहरुखचा बॉडीगार्ड रवीनेच 6 लाख 87 हजार रुपयांची कस्टम्स ड्युटी भरली. सकाळी 8 वाजता सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कस्टम्स अधिकाऱ्यांनी रवीला विमानतळावरून बाहेर जाऊ दिलं.

Related Post