मुंबईत गोवर आजारामुळे 7 जण दगावले

jitendra.dhabarde@gmail.com 2022-11-17 22:24:14.0
img

मुंबई : गोवरचा उद्रेक झालाय. आतापर्यंत गोवरमुळे 7 संशयितांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. मुंबईत जानेवारी पासून गोवरचे 142 गोवरचे आढळले आहेत. तर सद्यस्थितीत 61 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय. कोरोना काळात अनेकांनी मुलांना गोवरची लस दिली नाही.

लसीकरणाकडे (Vaccination) टाळाटाळ केल्यामुळेच गोवरचा प्रसार वाढताना दिसतोय. मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी.

गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Related Post