व‍िदर्भस्‍तरीय 'जुगाडू इंजिनीयर्स' स्‍पर्धा ग्रामायण प्रतिष्‍ठान नागपूरचे आयोजन

jitendra.dhabarde@gmail.com 2022-12-02 14:29:58.0
img

नागपूर : जीवनातील अनेक छोट्या-छोट्या समस्‍यांवर आपल्‍या कल्‍पक बुद्धीने जुगाड करून उत्‍तर शोधणारे अनेक प्रतिभावंत आहेत. त्‍यांच्‍यासाठी ग्रामायण प्रतिष्‍ठानच्‍यावतीने व मी टू वुई च्या सहकार्याने विदर्भस्‍तरीय जुगाडू इंजिनीयर्स स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

जुगाडू तंत्रज्ञानाने तयार केलेली कोणतीही वस्‍तू किंवा यंत्र जे शेतीसाठी, कारखान्‍यासाठी किंवा दररोजच्‍या जीवनात कामात येणारी, घरगुती अशा कुठल्‍याही विषयाशी संबंधित वस्‍तू किंवा यंत्र आपण तयार केले असल्‍यास आपल्‍याला या स्‍पर्धेत भाग घेता येईल. या स्‍पर्धेसाठी प्रवेश नि:शुल्‍क असून वय व शिक्षणाचीदेखील अट नाही. प्रवेश अर्ज व जुगाडू यंत्र व वस्‍तूचे व्‍हीडिओ पाठवण्‍याची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2022 आहे. या स्‍पर्धेतून निवडले गेलेल्‍या उत्‍कृष्‍ट जुगाडू वस्‍तू किंवा यंत्राला आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून

रामनगर मैदान, नागपूर येथे येत्‍या, 22 ते 26 डिसेंबर दरम्‍यान आयोजित करण्‍यात येत असलेल्‍या ग्रामायण प्रतिष्‍ठानच्‍या प्रदर्शनीत प्रदर्शित केले जाणार आहे. अधिक माहितीकरिता डॉ. कविता देशमुख 9890306392, राहूल बडगे 9890017442, नरेंद्र कुळकर्णी 9373009001, अरविंद अग्रवाल 9881244490, डॉ. क्षीतिजा कदम 9326235484 व किशोर केळापुरे 9823047924 यांच्‍याशी संपर्क साधावा.

Related Post