मनोज मुंतशिर यांनी केला देशप्रेमाचा जागर

jitendra.dhabarde@gmail.com 2022-12-08 22:59:18.0
img

नागपूर : ‍ भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, नमस्‍ते सदा वस्‍तले मातृभुमे सारख्‍या गर्जनांनी राष्‍ट्रवादी गीतकार, कौन बनेगा करोडपतीचे पटकथा लेखक मनोज मुंतशिर शुक्‍ला यांनी नागपूरकरांमध्‍ये राष्‍ट्रप्रेमाचा जागर केला.

राष्‍ट्रप्रेमाची गंगोत्री, भारताचे हृदयस्‍थान असलेल्‍या नागपूरमध्‍ये डॉ. हेडगेवारांनी हिंदू राष्‍ट्राचे बीज लावले होते. 'वसुधैव कुटुंकम' चा विचार देणारा, संपूर्ण जगाच्‍या कल्‍याणासाठी प्रयत्‍न करणा-या या आपल्‍या हिंदूराष्‍ट्रावर सर्वांना गर्व असला पाहिजे, असे सांगत मनोज मुंतशिर यांनी 'जिसमें गिरती सारी नदिया वो सिंधू है हम, सारे दुनिया को वतन कहते है हिंदू है हम' अशी कविता सादर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या मध्‍य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाच्‍या सातव्‍या दिवशी लेखक मनोज मुंतशिर शुक्‍ला यांचा 'माँ, मातृभूमी और मोहब्‍बत' हा कार्यक्रम सादर करण्‍यात आला. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात आपली कला सादर करण्‍यासाठी देशभरातील कलाकार प्रतिक्षा करीत असतात. आज महोत्‍सवात येऊन खूप आनंद होत आहे असे सांगताना मनोज मुंतशिर यांनी नितीन गडकरी यांचा दूरद्रष्‍टे व आदर्श नेते असा उल्‍लेख केला. तरुण पिढीने राधा-कृष्‍णाचे अपेक्षारहीत प्रेम, राम-सीतेचे विश्‍वासावर आधारित प्रेम यांना आपल्‍या प्रेमाचा आदर्श मानावा, असा संदेश त्‍यांनी अनेक किस्‍से सांगून केला. आईवरचे प्रेम, मातृभूमीवरचे प्रेमावर आणि तरुणाईचे प्रेम यावर मनोज मुंतशिर यांनी भाष्‍य केले. मातृप्रेमाचा रंग केसरिया कसा आहे हे रुपालीने 'केसरिया मेरा इश्‍क है पिया' या गाण्यातून सांगितले. कुणाल व रुपालीने 'तुम्‍हे दिल्‍लगी भूल जाने पडेगी', 'कैसे हुआ, कैसे हुआ?, ?बागों के हर फुल को समझे बागबान' आदी गाणी सादर केली. आजच्‍या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह निवृत्‍त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोळकर, जॉईंट चॅरिटी कमिश्‍नर आभा कोल्‍हे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी, माहिती आयुक्‍त राहूल पांडे, खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे. स्‍थानिक कलाप्रतिभांचा सन्‍मान खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात दरवर्षी नागपूरचे सांस्‍कृतिक क्षेत्राला प्रगल्‍भ करणा-या कलासाधकांचा सन्‍मान केला जातो. गुरुवारी विदर्भ साहित्‍य संघाचे सचिव व सप्‍तकचे विलास मानेकर, प्रतिभा नृत्‍य मंदिरच्‍या संचालिका रत्‍नम जनार्दनम, विणकर समाजातील कारागीर गजानन खापरे, चितारओळीतील मूर्तिकार शरद इंगळे, मूर्तिकार व चित्रकार प्रमोद सुर्यवंशी, बालकलावंतांच्‍या बसोली ग्रुपचे उपाध्‍यक्ष मंगेश बावसे, सुती साडी कलाकारीमध्‍ये राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्राप्‍त विणकर शंकर लक्ष्‍मण निनावे, संत साहित्‍याचे समाजप्रबोधनकार व संस्‍कार भारतीचे विदर्भ प्रांत महामंत्री आशुतोष अडोणी यांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. तत्‍पूर्वी, श्‍याम देशपांडे यांच्‍या नेतृत्‍वातील गायकांनी देशभक्‍तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन विवेक अलोणी यांनी केले. त्‍यानंतर अश्विन गिरीधारी निमजे यांनी हिंदी कवी व लेखक पं. रामधारी सिंह 'दिनकर' यांची 'कृष्‍णनीती' ही कविता सादर केली. छत्‍तीसगढी कलाकारांनी पंथी नृत्‍य सादर केले. संतगुरू घासीदास पंथी यांच्‍या वचनांनी प्रेरित खैरागढ येथून आलेले 30 कलाकारांनी गहरी राम जोशी यांच्‍या मार्गदर्शनात हे एकतेचा संदेश देणारे अप्रतिम नृत्‍य सादर केले.

Related Post