रॉकिंग परफॉर्मन्‍सने मोहित चौहान ने जिंकली तरुणाईची मने, सांस्कृतिक महोत्‍सवाचा थाटात समारोप

jitendra.dhabarde@gmail.com 2022-12-15 10:29:02.0
img

नागपूर : 'मस्‍सकली', 'अभी कुछ दिनों से लग रहा है', 'सुरमई शाम' सारख्‍या रॉकिंग गीतांना सादर करून सुप्रसिद्ध गायक मोहित चौहाण यांनी तरुणाईची मने जिंकली. ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर हजारोच्‍या संख्‍येने उपस्‍थ‍ित तरुणाईने कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या मध्‍य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचा रविवारी थाटात समारोप झाला. आज दहाव्‍या दिवशी लोकप्रिय गायक मोहित चौहाण यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट पार पडली. तरुणाईने कार्यक्रमाला हाउसफुल्‍ल गर्दी केली होती. मैदानाबाहेरही हजारोच्‍या संख्‍येने तरुणांनी कार्यक्रमाचा एलएडी स्‍क्रीनच्‍या माध्‍यमातून आस्‍वाद घेतला. मोहितने ?जो भी मै कहना चाहूं? या रॉकिंग गाण्‍याने कार्यक्रमाची सुरुवात केली. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवासारखा भव्‍य महोत्‍सव आयोजित केल्‍याबद्दल त्‍यांनी नितीन गडकरी यांचे आभारी आहे. माझे सासर नागपूरजवळच चंद्रपुरात असून नागपूरबद्दल बरेचदा ऐकायला मिळते, असे मोहित चौहान म्‍हणाले ?ये दुरिया, राहो की दुरिया? या गीतानंतर दिल तो बच्‍चा है जी चित्रपटातील गीत ?अभी कुछ दिनों से लग रहा है? सादर केले. नंतर ?मस्‍सकली? या गीताने तरुणाईची मने जिंकली. मोहितने सादर केलेल्‍या ?सुरमई शाम आती है? या गीताच्‍या सुरात सूर म‍िसळत तरुणाईने ताल धरला. या गाण्‍याला वन्‍समोअर मिळाला. ?तेरे संग ईश्‍क? यासारखी अनेक लेाकप्रिय गीते सादर करून मोहितने युवकांना थिरकायला लावले. आपल्‍या हटके स्‍टाईलने मोहित चौहाणने कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आजच्‍या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह आ. आशिष जयस्‍वाल, आ. प्रविण दटके, प्रशांत रहाटे, प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर, डॉ. संजय उगेमुगे, माजी खा. डॉ. विकास महात्‍मे, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. संजय दुधे, दिनेश सुर्यवंशी, भाजपा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्‍थ‍िती होते. दररोज होणा-या ?जागर राष्‍ट्रभक्‍तीचा? या कार्यक्रमात 400 कलावंतांनी गीते सादर केली. त्‍यातील काही कलावंतांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. त्‍यात श्‍याम देशपांडे, यामिनी पायघन, वैशाली उपाध्‍ये, अभिजीत बोरीकर, अंजुषा पांडवकर, माधवी पळसोकर, अनुपमा भोजराज, भाग्‍यश्री बारस्‍कर, प्रसन्‍ना जोशी, अमर कुळकर्णी, अंजली निसाळ, राधा ठेंगडी, प्रीती महाजन, सुगंधा देशपांडे, प्रशांत उपगडे यांचा समावेश होता. याशिवाय, रांगोळी आर्टीस्‍ट राधा अतकरी, राजेंद्र पुंड, हर्शल कावरे, धरती डेकोरेशनचे अलिम भाई, प्रो-साउंडचे संदीप बारस्‍कर, शांतनू वेळेकर लाईट्सचे विशाल यादव व व्हिडिओची जबाबदारी सांभाळणारे सनी जयस्‍वाल, सुरेश पाटील, यांचा सत्‍कार करण्‍यात आला. भव्‍य अशा खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या आयोजनाबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले. पुढील वर्षीदेखील यापेक्षाही मोठा महोत्‍सव व्‍हावा, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन जयप्रकाश गुप्‍ता यांनी केले. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे.

शिवाशाहीची जोशपूर्ण रणधुमाळी हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी गजरात शिवशाही ढोलताशा पथकाने ढोलताशा वादन करीत वातावरणात जोश भरला. पराग बागडे, अमीत पांडे व जय आसकर यांच्‍या नेतृत्‍वातील भगवा फेटा परिधान केलेल्‍या 150 युवक-युवतींनी दमदार वादन केले आणि वातावरण शिवमय झाले. तत्‍पूर्वी, प्रसिद्ध गायक अमर कुळकर्णी यांच्‍या नेतृत्‍वातील संस्‍कार भारतीच्‍या चमूने राष्‍ट्रभक्‍तीचा जागर केला. कार्यक्रमाचे निेवेदन स्‍मीता खनगई यांनी केले. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात मागील सहा वर्षात 74 विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले, ज्‍यात सुमारे 9500 राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या कलाकारांनी कला सादर केली. सुमारे 8 लाख लोकांनी दरवर्षी प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षरित्‍या कार्यक्रमांचा आस्‍वाद घेतला. यावर्षीच्‍या महोत्‍सवात 5 हजार कलाकारांनी आपली कला सादर केली. सांस्‍कृतिक महोत्‍सवाला आपण दिलेल्‍या या अभूतपूर्व प्रतिसाद दिल्‍याबद्दल नितीन गडकरी यांनी नागपूरकरांचे आभार मानले. क्रीडा प्रेमींसाठी खासदार क्रीडा महोत्‍सव लवकरच सुरू होणार असून यावर्षी ज्‍येष्‍ठ नागरिकांकरितादेखील तीन दिवसांचा महोत्‍सव साजरा करण्‍यात येणार असल्‍याची घोषणा नितीन गडकरी यांनी केले.

Related Post