Fri Nov 22 03:41:14 IST 2024
नागपूर : आर्थिक घडामोडी, वित्तीय यंत्रणा आणि गुंतवणूक पर्याय अशा सर्वसमावेशक अर्थविषयक साक्षरता विकसित करण्यासाठी मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लिमिटेडच्या वतीने विशेष परिषदेचे आयोजन केले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दीवर्षात आर्थिक घडामोडी कशा राहतील? यावर सखोल चर्चा होणार आहे.
नागपूरच्या रामदासपेठ परिसरातील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये शनिवार ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता 'अमृतकाल' या विचारमंथनाला सुरुवात होईल. तर, रविवार ८ जानेवारी रोजी चर्चासत्राचा समारोप होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, या अर्थविषयक परिषदेचे उद्घाटन होईल. उद्घाटन सत्रानंतर बाजारपेठेचे तज्ज्ञ एस.पी. तुलसियन परिषदेला संबोधित करणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजताच्या सत्रात केडीया सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक विजय केडीया आपले विचार मांडतील. तर, सायंकाळच्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर, व्हेंचर कॅटालिस्ट समूहाचे सह-संस्थापक डॉ. अपूर्व शर्मा उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन करतील. रविवार ८ जानेवारी रोजीच्या सत्रात अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल, मॉर्गन स्टॅनले भारतचे व्यवस्थापकीय संचालक रिधम देसाई, कोटक म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. अभ्यासपूर्ण आणि गुंतवणुकीचा मंत्र देणा-या या कार्यक्रमात प्रवेश मोफत राहणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन, नागपूर शहरातल्या यशस्वी युवा उद्योजिका आणि अर्थशास्त्राच्या तज्ञ अभ्यासक, शिवानी दाणी वखरे यांची आहे. २०१५ पासून शिवानी या असे कार्यक्रम सातत्याने आयोजित करीत आहेत. गेली २ वर्ष कोरोना मुळे असे उपयुक्त कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आले आणि आता पुन्हा एकदा प्रत्यक्षात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजनात इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनी बी इन्स्टिट्यूटच्या शिवानी दाणी-वखरे यांनी केले आहे.