Fri Apr 04 06:40:49 IST 2025
मुंबई प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आज पहाटेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ते ५८ वर्षांचे होते. त्यांनी एवढं टोकाचं पाऊन का उचललं असा प्रश्न आता सिनेसृष्टीतील त्यांच्या मित्र-परिवाराला पडला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्येच होते. मंगळवारी १ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता ते त्यांच्या खोलीत गेले. आज सकाळी ते बराच वेळ बाहेर न आल्याने त्यांच्या अंगरक्षक व इतर लोकांनी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, मात्र कोणताही आवाज किंवा कारवाई झाली नाही. तेव्हाच खिडकीतून नितीन देसाई यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
नितीन देसाई यांच्या कर्मचार्यांनी पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेले नाही. दरम्यान, 'राजू चाचा', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्ना भाई', 'दोस्ताना', 'हम दिल दे चुके सनम' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये भव्य सेट्स नितीन देसाईंनीच दाखवले. एवढेच नाही तर बिग बॉससारख्या शोच्या सेटचेही काम त्यांनीच केले.