Fri Nov 22 03:12:54 IST 2024
अमरावती : राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेची अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात भरभराटी झाली आहे. यासोबतच जिजाऊ बँकेद्वारे १ हजार उद्योजक निर्मितीच्या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले असून त्याचा शुभारंभ पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धीरज लिंगडे यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार धीरज लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिजाऊ बँकेत आयोजित समारंभ प्रसंगी बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी लिंगाडे यांचे शहिद भगतसिंह यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. शिवाजी देशमुख यांचे स्वागत संचालक बबन आवारे यांच्यातर्फे करण्यात आले. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत अविनाश कोठाळे यांनी जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव बँकेच्या भरभराटीचा आलेख मांडला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ३१ मार्च १९९९ मध्ये १५५४ सभासदांनी २२.७४ लक्ष भाग भांडवला पासून सुरू होऊन ३१ मार्च २०२३ला या वर्षात बँकेचे एकूण ८४७१ सभासद असून १३.७१ कोटी भाग भांडवल, बँकेची भाग भांडवल पर्याप्तता १७.९७ आणि नेटवर्क ३५.२६ कोटी तथा नक्त अनुत्पादक कर्ज संविधानिक अंकेक्षणानुसार १.२९% आहे. बँक दरवर्षी नफ्यात असून सभासदांना चालु आर्थिक वर्षात 10% लाभांश देणार आहे.बँकेचा सध्या उद्योग मिक्स ठेवी ३८०.५५ कोटी व २६८.३४ कोटी असा एकूण ६५० कोटी पेक्षा जास्त आहे आणि 1000कोटीचे ऊद्दीष्ठसाध्यकरण्याचा बँकेचा संकल्प आहे. बँकेची गुंतवणूक १३३ कोटी पर्यंत आहे. या काळात बँकेच्या झालेल्या विकास हा डोळे दीपविणारा आहे. तर आमदार धीरज लिंगाडे म्हणाले, मी सुद्धा एक सहकारी पत संस्था बुलठाणा येथे चालवितो. सहकारी संस्था यशस्वीपणे चालवणे एक मोठे आव्हान आहे. ग्राहक कर्जाची उचल करतात. अशा वेळी कर्जाची परतफेड न झाल्यामुळे नाईलाजाने कर्ज वसुलीचे कार्यवाही करावी लागते. अशा काळात काही लोक नाराज होऊन बँकेची प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीवपूर्वक विरोधकांना सोबत घेऊन प्रयत्न करतात. मात्र अडचणीच्या काळात बँकेनी मदत केल्याचे विसरुन नाराज ग्राहकांनी बँकेची बदनामी करू नये . जेणेकरून नागरिकांमध्ये संभ्रमावस्ता निर्माण होईल असे त्यांनी स्पष्ट करत जिजाऊ बँकेच्या कामकाजाचे व ऊत्कृष्ठ कार्पोरेट संस्कृतिमधील सहकारी बँकेचे विशेष कौतुक केले. त्यांनी बँकेच्या विविध विभागांची पाहणी केली. बँकेच्या वतीने १ हजार उद्योग निर्मितीची संकल्पना मांडून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्याच्या शुभारंभ केला.
बँकेच्या अकोला, अमरावती व यवतमाळ शाखांमधून नव युवकांना ऊद्योग ऊभारणीसाठी जिल्हा ऊद्योग केन्द्रामार्फत 25लक्ष कर्जाच्या 25टक्के सबसीडी असलेल्या योजनांसाठी नवयुवकांना 200विविध प्रकारचे ऊद्योग ऊभे करण्यासाठी आपण सुद्धा मदत करणार असल्याचे अभिवचन यावेळी आमदार धीरज लिंगडे यांनी दिले. तसेचअण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ तसेच ओबीसी आर्थिक विकास महामंडळाअंतर्गंत युवकांना 15 लक्षापर्यंतचे सरकार 7वर्षा पर्यंत व्याज सरकारतर्फ परतफेड करणारी सुविधा असल्याने विविध उद्योग युवकांनी सुरु करण्याचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार लिंगाडे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन बँकेच्या प्रशासन अधिकारी अर्चना बारबुद्धे यांनी तर आभार संचालक बबन आवारे यांनी मानले. संचालक प्रदीप चौधरी, व्यवस्थापन समिती सदस्य एडव्होकेट वासुदेव बुरंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरीश नाशिरकर, शाखा व्यवस्थापक विजय ढोबे, किरण दिवाण, राहुल आमले, सागर राऊत, मनीष देशमुख, दीपक मेटे, चैताली गुडधे, चैताली वानखडे यांच्यासह बँकेतील कर्मचारी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.