मनोज जरांगे पाटील इगतपुरीत आरक्षणासाठी जाहीर सभा

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-11-14 21:17:30.0
img

नागपूर : मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर जागृती सभा होणार असून 22 नोव्हेंबर रोजी इगतपुरी तालुक्यातील शनीतफाटा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १०१ एकरवर ही सभा होणार असून ७० एकरवर पार्किंरची सोय करण्यात आली आहे. तर ५ हजार स्वयंसेवकाची फौज तैनात राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.

सकल मराठा समाज इगतपुरी तालुक्याच्या वतीने आज सभेसंदर्भात पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदे दरम्यान प्रशासनाला निवेदन देण्यात आले व व सभेसंदर्भात माहिती देण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांची 101 एकरवर जाहीर सभा होणार असून या सभेचे आयोजन 67 गावांच्या वतीने करण्यात आले आहे. इगतपुरी शहराकडून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी साकूर फाट्यालगत कोठुळे पंपाजवळ 70 एकर रानावरती पार्किंगचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भगूरमार्गे येणाऱ्या लोकांसाठी गायरानावरती 25 एकरमध्ये पार्किंगची सोय करण्यात आली आहे. सिन्नरमार्गे येणाऱ्या लोकांसाठी कडवा पुलालगत 35 एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था, ठीक ठिकाणी पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा, शौचालय उपलब्ध करण्यात आलेली आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने 5000 स्वयंसेवकांची नेमणूक या सभेसाठी करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालण्यातील अंतरवालीत आमरण उपोषण छेडल होतं. दरम्यान राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. मात्र उपोषण मागे घेतानाच सरकारने अटी मान्य केल्या नाहीत तर पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच आंदोलन मागे घेतले नाही तर स्थगिक केलं आहे, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांनी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. त्या साखळी उपोषणाच्या जागृतीसाठी या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Post