राहुल गांधी हे मूर्खांचे सरदार, राहुल गांधी यांच्या टिकेनंतर मोदींची टोला

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-11-14 21:41:35.0
img

भोपाळ :पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ?मुर्खांचे सरदार? असल्याचे संबोधले. भारतात वापरले जाणारे मोबाइल हे शक्यतो चीनमधून तयार होऊन आलेले आहेत, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती.

या टीकेला प्रत्युत्तर देत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ?भारत आता एक लाख कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे मोबाइल निर्यात करणारा देश बनला आहे. काँग्रेस नेते भारताच्या यशाकडे दुर्लक्ष करण्याच्या मानसिक आजाराने ग्रासले आहेत.? राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ?काल काँग्रेसच्या काही शहाण्यांनी टीका केली. भारतातील लोक चीनमधून आलेले मोबाइल वापरतात, असे त्यांनी सांगितले. अरे मुर्खांच्या सरदार, तू कोणत्या जगात राहतोस? भारताच्या यशाकडे दुर्लक्ष करण्याच्या मानसिक आजाराने काँग्रेस नेत्यांना ग्रासले आहे. त्यांनी कोणता परदेशी चष्मा घातलाय, ज्यामुळे त्यांना भारत दिसत नाही, याचे मला आश्चर्य वाटते.? काँग्रेसवर टीका करत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारत आता मोबाइल उत्पादन करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश बनला आहे.

?काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत होता, तेव्हा भारतात केवळ २०,००० कोटी रुपयांचे मोबाइल उत्पादन होत होते. आज, भारतातील मोबाइल उद्योग २.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यातही भारतातून एक लाख कोटी रुपयांचे मोबाइल निर्यात होत आहेत?, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका करण्यात राहुल गांधी नेहमीच आघाडीवर असतात. सध्या ते प्रचारात दंग आहेत. सोमवारी एका जाहीर सभेत बोलत असताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष भारताला उत्पादनाचा हब बनवू इच्छित आहे. ?तुम्ही तुमच्या मोबाइल फोनच्या मागे पाहा, तुमच्या शर्ट, बुटावर पाहा, तिथे ?मेड इन चीन? (Made in China) असे लिहिलेले आढळेल. कॅमेरा किंवा शर्टच्या मागे तुम्ही कधी ?मेड इन मध्य प्रदेश? असा टॅग लिहिलेला पाहिला आहे का? आम्हाला नेमके हेच अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आमचा पक्ष प्रयत्न करेल?, अशा शब्दात राहुल गांधी यांनी स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडताना भाजपाला टोला लगावला होता.

Related Post