' दि कुटे ग्रुप'च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, तीन महिन्यापासून मिळाले नाही वेतन

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-11-14 23:43:37.0
img

नागपूर : दि कुटे ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे या समाजकारण, महिलांच्या सबलीकरणाची मोठी विधाने करीत असल्या तरी त्यांचं प्रत्यक्षातील कामे ही या विपरीत आहे.दि कुटे ग्रुपच्या नागपुरातील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही. त्यांची अंधारात दिवाळी आहे.

नागपुरात भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या अर्चना कुटे यांच्या समोरचं नागपूरच्या कर्मचाऱ्यांनी ही आपबीती सांगितली. दि कुटे ग्रुप हे डेअरी प्रॉडक्ट, खाद्यतेलासह विविध उत्पादनांची निर्मिती करतात. सुरेश कुटे हे या कंपनीचे संस्थापक व मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत. पुणे येथे कंपनीचे मुख्यालय आहे. अलीकडेच दि कुटे ग्रुपच्या एमडी अर्चना कुटे यांनी नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी रामदासपेठ येथील हॉटेल तुली इंपेरियल येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात नागपूरचे सहायक विपणन व्यवस्थापक यांनी अर्चना कुटे यांच्यासमोर तक्रारी केल्या. कंपनीने तीन महिन्यापासून वेतन दिले नाही. आम्ही जगावे कसे हा प्रश्न उपस्थित केला. दिवाळी संपल्यानंतर तुम्हाला वेतन दिल जाईल, असे आश्वासन यावेळी अर्चना कुटे यांनी दिले, अशी माहिती विश्वस्तांनी नाव प्रकाशित करू नये या अटीवर सांगितली.

Related Post