Mon Nov 25 03:35:15 IST 2024
मालेगाव : कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी कसेही, काहीही बोलू नये, आपल्या मर्यादेत राहून बोलावे, असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी बोलावे. महाराष्ट्र संस्कारक्षम राज्य आहे. देव, देश, धर्म संस्कृती जपणारे आहे.
धुळे लोकसभा प्रवासादरम्यान मालेगाव येथे भाजपा सुपर वॉरियर्स व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे म्हणाले, सरकारच्या प्रश्नावर उत्तरे देण्यासाठी सरकार सक्षम आहे, त्यावर उत्तर देणार नाही. मी लोकसभा क्षेत्रात पक्षसंघटनात्मक कामानिमित्त आलो आहे, त्यावरच काम करेल. भाजपाचे सुपर वॉरियर्स जनतेच्या घरापर्यंत पोहचून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे काम समाजावून सांगणार आहेत, ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही. त्यांना सरकारी योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल हे बघणार आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात महायुतीचे ४५ प्लस खासदार निवडून येतील. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, खासदार डॉ. सुभाष भामरे, मालेगाव जिल्हाध्यक्ष निलेश कवचे, धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, लोकसभा निवडणूक प्रमुख राजवर्धन कदमबांडे, भाजपा उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा भाजपा मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, भाजपा शैक्षणिक संस्था प्रकोष्ट प्रदेश सहसंयोजक धनराज विसपुते, माजी महापौर प्रतिभा चौधरी, अनुप अग्रवाल, माधुरी बोरसे, प्रताप दिगावकर, देवा पाटील, पंकज ठाकरे, दादा जाधव, सुरेश निकम, कमलेश निकम यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख उपस्थित होते.
जनतेच्या सन्मानासाठी मोदींचे प्रयत्न मालेगाव येथे मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य व बागलान आणि धुळे येथे धुळे शहर, धुळे ग्रामीण व सिंदखेडा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते कार्यकर्त्यांना म्हणाले, देशातील नागरिकांना सन्मान मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करीत आहेत.राज्यातील महायुती सरकारने जनकल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत. त्याचाही प्रचार प्रसार जनतेपर्यंत करावा. श्री बावनकुळे यांनी धुळे शहरात घर चलो अभियानात सहभाग घेतला व जनतेशी संवाद साधला. धुळे प्रवासात त्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांनी भाजपात प्रवेश केला. ? पंकजा मुंडे नाराज नाहीत! पंकजा मुडे यांच्या नेतृत्वाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या नाराजीने विरोधकांचा काही फायदा होईल असे अनेकांना वाटते. पण पंकजाताईंच्या रक्तारक्तात भाजप आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तृत्वाने उभा राहिलेला महाराष्ट्रात पंकजाताई कधीही नाराज राहू शकत नाहीच.