शब्द मागे घेतो, लायकी नसणाऱ्यांच्या..., वक्तव्यावर मनोज जरांगे पाटीलांचे स्पष्टीकरण

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-11-27 20:16:57.0
img

छत्रपती संभाजीनगर : लायकी नसताना यांच्या हाताखाली काम करावे लागते असे वक्तव्य म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. मात्र हे वक्तव्य मी वेगळ्या अर्थाने केले होते याचा राजकीय अर्थ घेण्यात आला. माझ्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या सल्ल्यामुळे व सामाजिक स्वास्थ्यासाठी मी हा शब्द मागे घेत आहे. मी कुणाच्याही दबावाला बळी पडून मी हा शब्द मागे घेत नाही,

असे स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी दिले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की,आपण बोलताना बोलतो त्याचा वेगळा अर्थ घेतला जातो.स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी राजकीय फायद्यासाठी ते स्वतःच्या अंगावर उडून घेतात. माझ्या वक्तव्याला एका समाजाकडे ओढण्याचा प्रयत्न केला. मी जन्मापासून कधीच जातिवाद केला नाही आणि करणारही नाही. मात्र मला जे बोलायचे होते, त्याचा अर्थ वेगळा होता. माझ्या वक्तव्यामुळे जर का समाज स्वस्त बिघडत असेल तर त्यासाठी मी हा शब्द मागे घेतो. मी कुणाच्या दबावाखाली किंवा मी कुणाच्या टिकांना घाबरून हा शब्द मागे घेत नाही, तर प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे व समाजाचे स्वास्थ खराब होऊ नये, यासाठी मी हा शब्द मागे घेत आहे, अशी कबुली मनोज जरांगे पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम'शी बोलताना दिली. मराठवाड्यातील मराठा समाजातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती. आता त्या समितीचे काम संपले असून ती बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की,शिंदे समिती ही मराठवाड्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी होती त्यांनी अभ्यास केला तर बरं होईल. कायद्याला चॅलेंज करणे एवढे सोपे नाही.

समिती महाराष्ट्रासाठी काम करते सरकारने कायद्याच्या पुढे कोणीच नाही. कायद्याने तयार केलेली समिती रद्द करणे एवढी सोपे नाही. मराठा समाजाच्या कानाकोपऱ्यातील नोंदी तपासणे आवश्यक आहे. समिती रद्द करण्यात आली तर सरकारला समाजाच्या रोषीला समोर जावे लागेल, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Related Post