Fri Nov 22 06:03:12 IST 2024
छत्रपती संभाजीनगर : देशात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. देशातील लोक मोदींच्या पाठीशी आहेत, त्याच बळावर राज्यात महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील. २०२४ ची निवडणूक देशाला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणार, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
देशात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. देशातील लोक मोदींच्या पाठीशी आहेत, त्याच बळावर राज्यात महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील. २०२४ ची निवडणूक देशाला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणार, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ प्रवासात त्यांनी लासूर येथे गंगापूर, कन्नड व वैजापूर आणि छ. संभाजीनगर येथे शहरातील संभाजीनगर पूर्व, मध्य व पश्चिम या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील भाजपा सुपर वॉरिअर्सशी संवाद साधला. ते म्हणाले, २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. यावेळी केवळ विजय नव्हे तर महाविजय साकारायचा आहे. हा निर्धार करूनच मी राज्यभरात दौरा करीत आहे. यात सुपर वॉरियर्स यांचा मोलाचा वाटा असेल. सुपर वॉरियर्स हेच खरे नेते आहेत, ते आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. येत्या काळातला भारत व महाराष्ट्र घडविण्याची जबाबदारी सुपर वॉरिर्यसवर आहे.
यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवतजी कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, मराठवाडा संघटनमंत्री संजयजी कौडगे, आमदार प्रशांत बंब, आमदार प्रशांत बच्छाव, प्रदेश सचिव किरण पाटील, छ.संभाजीनगर शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, संभाजी नगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते, लोकसभा निवडणूक प्रमुख समीर राजूरकर, लोकसभा विस्तारक गोविंद केंद्रे, संजयजी गव्हाणे, शालिनीताई बुंधे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकारच्या योजनांची माहिती द्या मोदी सरकारने मागील 9 वर्षांत जेवढी कामे केली तेवढी त्यांच्या पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारने केली नाही. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, महिलांसाठी लोकसभेत 33% जागांचे आरक्षण, विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण, युवकांसाठी रोजगाराच्या विविध योजना आखल्या आहेत. आता विश्वकर्मा योजने्या माध्यमातून पारंपरिक उद्योगांना बळ देण्याचे काम केले जात आहे. अन्न सुरक्षा योजना पाच वर्षांसाठी वाढविली असून त्याचा लाभ देशातील 80 कोटी लोकांना मिळणार आहे. राज्यातील महायुती सरकारने जनकल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत. त्याचाही प्रचार प्रसार सुपर वॉरियर्सनी जनतेपर्यंत करावा, असेही आवाहन बावनकुळे यांनी केले.