महाराष्ट्रात ९९९ कोरोना रुग्ण, १३९ नव्या रुग्णांची भर

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-01-08 21:29:49.0
img

मुंबई : २४ तासात देशातील १२ राज्यातून जेएन १ चे नवे ६८२ रुग्ण समोर आले आहेत. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याने सोमवारी ही अपडेट दिली. नव्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण कर्नाटकात सापडले आहेत.

कर्नाटकात २४ तासात १९९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ केरळमध्ये १४८, महाराष्ट्रात १३९, गोव्यात ४७, गुजरातमध्ये ३६, आंध्र प्रदेशमध्ये ३०, राजस्थानमध्ये ३०, तामिळनाडूत २६, दिल्लीत २१, ओडिसा ३, तेलंगणामध्ये २ तर हरियाणामध्ये एक रुग्ण सापडलाय. देशात जेएन १ च्या रुग्णांची संख्या वाढत असताना सध्या काळजी करण्याचे कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यांना करोनाची लागण झाली आहे, त्यापैकी अधिकतर लोकांवर घरात उपचार सुरू आहेत. त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आहेत.

भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र आणि राज्य सरकारांनी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. तसेच योग्य ती खबरदारी घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्यांना देण्यात आलेत. करोनाची लागण झाल्याने उपचार सुरू असलेल्या देशातील रुग्णांची संख्या ४ हजार २ इतकी आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशात एकूण ४ जणांचा मृत्यू झालाय. यात केरळमध्ये दोघांचा तर कर्नाटक आणि त्रिपूरामध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. हिवाळा सुरू झाल्याने करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पाच डिसेंबरनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची संख्या ३१ डिसेंबर रोजी नोंदवण्यात आली होती. या दिवशी एकूम ८४१ रुग्ण आढळले होते. ज्यांना करोनाच्या जेएन १ या नव्या व्हेरिंएटची लागण झाली आहे त्यापैकी ९२ टक्के रुग्ण घरातच उपचार घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Post