प्रभू रामानेच भक्त मोदी यांची मंदिर उभारणीसाठी निवड

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-01-13 22:28:09.0
img

मुंबई : संपूर्ण रथयात्रेत मोदी हे माझ्यासमवेत होते. त्या वेळी ते फारसे प्रसिद्ध नव्हते. मात्र, त्याच वेळी प्रभू रामानेच त्याच्या भक्ताची (मोदी) मंदिर उभारणीसाठी निवड केली. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभे राहावे, असे नियतीनेच ठरवले आहे, अशी जाणीव मला त्या वेळी झाली. मोदी जेव्हा राममूर्तीची प्रतिष्ठापना करतील. तेव्हा ते देशातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतील.

असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले. हे मंदिर प्रभू रामाचे गुण अंगीकारण्यासाठी सर्व भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहो, अशी प्रार्थना अडवाणी यांनी केली. आज अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहत असताना मला अटलजींची उणीव भासते आहे.

'राष्ट्रधर्म' या १६ जानेवारीला प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकातील लेखात अडवाणी यांनी हे मत व्यक्त केले आहे. राम मंदिर निर्माण, एक दिव्य स्वप्न की पूर्ती' असे या लेखाचे नाव आहे. मंदिर उभारणीसाठी त्यांनी मोदींचे अभिनंदन केले आहे. सध्या ९६ वर्षांचे असणारे अडवाणी २२ जानेवारीला उपस्थित राहणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.

Related Post