Fri Nov 22 02:54:00 IST 2024
नागपूर : नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आणि रसायनमुक्त शेतमालाच्या माध्यमातून लोकांना चांगले पोषण उपलब्ध करून देण्याचे एक दालन म्हणजे ?ग्रीन पोषण? होय. ?ग्रीन पोषण? ने १६ फेब्रुवारी 2024 रोजी यशस्वीरित्या 2 वर्ष पूर्ण केली असून शेतकऱ्याद्वारे नैसर्गिकरित्या पिकवलेली आणि
विविध महिला बचत गटांद्वारे प्रक्रिया केलेली उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे आपल्या दैनंदिन अन्नधान्य आणि कडधान्यांचे पौष्टिक मूल्य कमी झाले आहे. पौष्टिकतेच्या हानीव्यतिरिक्त, रासायनिक पद्धतीने तयार केलेल्या अन्नाची चव देखील बदलली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपण अनेक आजारांना बळी पडतो आहे. नैसर्गिक उत्पादनांच्या माध्यमातून पौष्टिकतेने भरलेले अन्नधान्य उपलब्ध करून देणे, हे ?ग्रीन पोषण?चे उद्दिष्ट आहे. सध्या 'ग्रीन पोषण' रसायनमुक्त शेतमालाच्या माध्यमातून लोकांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान्य, मसूर, कडधान्ये, मसाले उपलब्ध करून दिले आहे, असे एसएसके अॅग्रोचे सीओओ जयदीप सातवळेकर यांनी सांगितले. ?ग्रीन पोषण?च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या उपक्रमाची स्थापना अमोल एम. शिंगारे, व्यवस्थापकीय संचालक, जिओटेक सर्व्हिसेस प्रा. लि. यांचे मार्गदर्शनात जयदीप आणि त्यांचे मित्र डॉ. सुधनवा शिंगारे, संचालक एसएसके ॲग्रो सोल्युशन्स प्रा. लि. यांनी केली आहे. ही संपूर्ण चमू पत्रकार परिषदेत उपस्थित होती. एसएसके ॲग्रो सोल्युशन्स प्रा. लि ही ग्रीन पोषणची पॅरेंट कंपनी आहे. ए.एम. शिंगारे हे जवळजवळ एका दशकापासून नैसर्गिक शेती आणि त्याच्या उपयुक्ततेचा प्रचार प्रसार करत आहे. अलीकडच्या कोरोना साथीच्या काळात, आरोग्याचे रक्षण करण्यासाठी नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आणि हरित प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या फायद्यांबद्दल लोकांना जागरूक करण्याची वेळ आली आहे, असे त्यांना वाटले. जयदीप यांनी पुढे स्पष्ट केले की, ग्रीन पोषण महिलांनी चालवलेल्या कुटीर उद्योगांद्वारे पारंपारिक पद्धतींने उत्पादित केलेले लोणचे, चटण्या आणि इतर मसाले यांसारखे पदार्थ देखील उपलब्ध करून देते.
लोकांना नैसर्गिकरित्या पिकवलेल्या उत्पादनांचे सेवन करण्यास प्रोत्साहित करून निरोगी समाज निर्माण करणे, हे ग्रीन पोषणचे उद्दिष्ट आहे. आमच्या पारदर्शक प्रक्रिया आणि अस्सल उत्पादनांद्वारे आम्ही ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. तसेच, शेतकऱ्यांना एक स्थिर आणि फायदेशीर बाजारपेठ देऊन नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे , असे सातवळेकर म्हणाले. वेबसाईट greenposhan.com : अस्सल सेंद्रिय आणि हरित उत्पादनांसाठी शोधाशोध करण्याची आता गरज नाही कारण आपल्या नागपूरच्या 'ग्रीन पोषण'ची नवी कोरी ई-कॉमर्स वेबसाइट www.greenposhan.com लॉंच झाली आहे. तुमच्या आवडत्या आणि रुचकर पोषणाची ऑर्डर देण्यासाठी फक्त या वेबसाइटला भेट द्या आणि आपली मनपसंत उत्पादने घरपोच बोलवा. विविध कल्पनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कथा हे सर्वोत्तम माध्यम असते. 'ग्रीन पोषण' मध्ये आम्ही कथाकथनाद्वारे नागपूरच्या तरुणांच्या मनात पोषणाविषयी जागरुकता आणू इच्छितो. आम्ही आमच्या ग्राहकांना वर्धापन दिनाच्या महिन्यात *फेब्रुवारी महिनाभर) खरेदीवर 20% टक्के सूट देऊ करीत आहोत. ही ऑफर ऑनलाइन शॉपिंगवरही लागू आहे.