युनिटी बँकेची शाखा सुरू, आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते उद्घाटन

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-07-20 14:36:28.0
img

नागपूर : येथील निवासी आता मोबाइल अॅपच्या माध्यमातून, तसेच शहरामध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या नवीन शाखेमध्ये सोईस्कर व स्मार्ट बैंकिंग सुविधांचा आनंद घेऊ शकतात

युनिटी बँक मुदत ठेवींवर प्रतिवर्ष ९.५ टक्क्यांपर्यंत व्याज आणि बचत खात्यांवर प्रतिवर्ष ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज देते. नागपूर, जुलै २०, २०२४ - युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (युनिटी बँक) या आधुनिक, डिजिटल-केंद्रित बँकेने सेंट्रल अव्हेन्यू रोड येथे नवीन शाखेच्या उद्घाटनासह ऑरेंज सिटी नागपूरमध्ये आपली उपस्थिती दर्शवली आहे. युनिटी बँक शहरातील वाढत्या व्यवसाय संधींचा फायदा घेईल, ग्राहकांना ठेवींवर आकर्षक व्याजदर देईल, एमएसएमईंना व्यवसाय कर्ज देईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरमधील नागरिकांना स्मार्टर, गतीशील व अधिक सोईस्कर बँकेसोबत बँक व्यवहार करण्याची संधी देईल. अधिक पुढे जात, युनिटी बँकेची शहरामध्ये विविध शाखांचे उद्घाटन करण्याची योजना आहे. युनिटी बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या उपस्थितीत माननीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. युनिटी बैंक ज्येष्ठ नागरिकांना प्रतिवर्ष ९.५० टक्के आकर्षक व्याजदराने मुदत ठेवी देते, तर रिटेल गुंतवणूकदारांना प्रतिवर्ष ९ टक्के व्याज देते.

बचत खात्यांसाठी युनिटी बैंक ५ लाख रूपयांपेक्षा जास्त ठेवींकरिता प्रतिवर्ष ७.५ टक्के व्याज देते, आणि १ लाख रूपयांपासून ५ लाख रूपयांपर्यंतच्या ठेवींसाठी प्रतिवर्ष ७.२५ टक्के व्याज देते. तसेच, निवडक शाखांमध्ये आकर्षक दरांत लॉकर्स देखील उपलब्ध आहेत. युनिटी बँकेचे एमडी व सीईओ इंदरजीत कमोत्रा म्हणाले, "नागपूरमध्ये आमच्या उपस्थितीचा विस्तार युनिटी बँकेसाठी अग्रेसर पाऊल आहे, जेथे नागपूर शहर प्रगत होत असलेले व्यवसाय हब आहे. शहर कृषी उत्पादन, कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असण्यासोबत प्रमुख लॉजिस्टिक्स व ट्रेडिंग सेंटर आहे. तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एमएसएमई व एचएनआय लोकसंख्या आहे आणि युनिटी बँकेचा या डायनॅमिक लँडस्केपचा फायदा घेत नागपूरमधील उद्योजक व नागरिकांना सर्वोत्तम आर्थिक लाभ देण्याचा मनसुबा आहे. आम्हाला विश्वास आहे की, आमचा डिजिटल-केंद्रित दृष्टीकोन नागपूरमधील तंत्रज्ञान-प्रेमी रहिवाशांशी संलग्न होईल आणि त्यांना त्यांचे आर्थिक व्यवहार कार्यक्षमपणे व सुरक्षितपणे व्यवस्थापन करण्यास सक्षम करेल." युनिटी बँक ही शेड्यूल्ड कमर्शियल बँक आहे, जिला सेंट्रम फायनान्शियल सर्विसेस लि.द्वारे प्रमोट केले जाते. बँकेच्या ७,५०० कोटी रूपयांहून अधिक ठेवी, ८,५०० कोटी रूपयांहून अधिक एकूण मालमत्ता आणि भारतातील २० राज्यांमध्ये जवळपास ४०० बँकिंग आऊटलेट्सचे नेटवर्क आहे.

Related Post