Fri Nov 22 03:55:50 IST 2024
नागपूर : आंबेडकरी लोकशाहीर वामनदादा कर्डक साहित्य प्रबोधिनी नागपूर आयोजित वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त 'गित वामन' काव्य गीताचा कार्यक्रम नुकताच काशीनगर रामेश्वरी येथील विमेंन्स विंग्स फिटनेस येथे
संपन्न झाला. आदरणीय भंते हर्षदिप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मुख्य अतिथी प्रा.एस.आर.शेंडे जेष्ठ कवी उपस्थित होते वामनदादा कर्डक साहित्य प्रबोधिनी चे मुख्य संयोजक डॉ.भूषण भस्मे यांनी वामनदादा यांच्या जिवनावर प्रकाश टाकून संस्थेची भूमिका विषद केली ३२ कवींनी भारदार कविता गित व गझलांनी साऱ्यांना मंत्रमुग्ध केले शाहिर सुर्याने शेंडे,शाहिर मारोती मारबते, यांनी गीत व रवी बोरकर, हृदय चक्रधर प्रकाश कांबळे, प्रभू फुलझेले दिवाकर शिर्के रोशनी गणविर यांनी गझल चरणदास वैरागडे, रविंद्र गेडाम, मनोहर गजभिये, जगदीश राऊत, प्रकाश बावनगडे, रंगराज गोस्वामी, दिगांबर चनकापूरे,प्रा.नाना शेंडे,विलास मेश्राम, दादाराव पाटील,माधव जांभूळे, नागोराव सोनकुसरे, डॉ सुनंदा जुलमे,प्रतिभा सहारे,प्रितीबाला बोरकर रजनी संबोधी,प्रज्ञा मेश्राम, निर्मला जिवने,रजनी फुलझेले,मिरा मदनकर इत्यादीनी सुंदर रचना सादर केल्या प्रा.एस.आर.शेंडे यांनी आपल्या वक्तव्यात वामनदादा एक सच्चा व स्वाभिमानी आंबेडकरवादी कवी गितकार तसेच गायक व गझलकार होते ते आंबेडकरी नव कविंसाठी प्रेरणादायी आहे.
अध्यक्षांनी वामनदादा खऱ्या अर्थाने आंबेडकर चळवळ जगले अतिशय दारिद्र्य अवस्थेत जगूनही त्यांनी आपला स्वाभिमान डगमगू दिला नाही हे आदर्श येणाऱ्या पिढीसमोर उभे केले रिझर्व्हेशन चा प्रश्न त्यांनी आपल्या गीतातून मांडला सांगा बिर्ला टाटा बाटा कुढं आहे हो धनाचा साठा आमचा वाटा कुढं आहे हो वामनदादाचे गिताने टाटा बिरलाचे धाबे दणाणले अशा त्यांच्या गितात ताकद होती ही ताकद डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी विचारांची होती. पाहुण्यांचे स्वागत समितीच्या सर्व सदस्यांचे हस्ते करण्यात आले तर कवींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कवी रंगराज गोस्वामी तर आभार कवी मनोहर गजभिये व भूमिका डॉ भूषण भस्मे यांनी मांडली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.