डॉ. संजय कृष्‍ण ?सलील? यांची श्रीमद्भागवत कथा 20 ते 26 ऑगस्‍ट दरम्‍यान आयोजन

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-08-18 21:46:58.0
img

नागपूर : राजस्‍थानी महिला मंडळ, नागपूरच्‍यावतीने येत्‍या, 20 ते 26 ऑगस्‍ट दरम्‍यान वैष्‍णव गुरू व वृंदावन येथील तुलसी रामायण भागवत पीठाचे संस्‍थापक डॉ. संजय कृष्‍ण ?सलील? यांच्‍या श्रीमद्भागवत कथा महायज्ञाचे आयोजन करण्‍यात आले आहे. राज्‍स्‍थानी मह‍िला मंडळ, सीताबर्डी, नागपूर येथे दररोज दुपारी 3 ते 6 वाजेदरम्‍यान हा महायज्ञ

होणार आहे. मंगळवार, 20 ऑगस्‍ट रोजी शोभायात्रा व महात्‍म्‍यने या महायज्ञाला प्रारंभ होणार आहे. 21 तारखेला परीक्षित जन्‍म व कली दमन, 22 तारखेला ध्रुव चरित्र, 23 तारखेला रामकृष्‍ण जन्‍म, 24 तारखेला छप्‍पन भोग आणि 25 तारखेला रुक्मिणी विवाह तर 26 तारखेला सुदामा चरित्र विषयावर ते आख्‍यान करतील. दररोज कथेदरम्‍या दिव्‍य झांकीचे दर्शन होणार आहे. सोबतच, राजस्‍थानी महिला मंडळ व नारायण सेवा संस्‍थान यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने 24 व 25 ऑगस्‍ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दिव्‍यांगांसाठी नि:शुल्‍क शिबिराचे आयेाजन करण्‍यात आले आहे. उदयपुर येथून आलेले डॉक्‍टर दिव्‍यांगांची चिकित्‍सा व उपचार केले जाणार असून गरजूंना उदयपूर येथील नारायण निम्‍ब्‍स लावले जाणार आहेत.

राजस्‍थानी मह‍िला मंडळाच्‍या अध्‍यक्ष सुषमा डांगरा व सचिव सरोज सामोनी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयोजनाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रभारी रंजू चांदडक, ललिता मंत्री, मुख्‍य संयाजिका शोभा हेडा, सावित्री पचीसिया, मीना अग्रवाल, रजनी शहलोत, उषा चांडक, मीरा मालपानी, निर्मला राठी, आशा दुजारी, शांता सावल, अनिता पसारी, विद्या लद्धड़, अंजली गुप्ता ,कल्पना सोमानी, दीपाली तुलसी नंदन ,लता राठी, सरिता झंवर, स्वाती भूतडा, विजया राठी यांचे सहकार्य लाभत आहे, ही माहिती प्रचार मंत्री रश्‍मी चांडक यांनी दिली.

Related Post