स्वाक्षरी अभियानासाठी काँग्रेस कार्यकर्ते घरोघरी

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-08-18 21:50:20.0
img

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या नियोजन शून्यतेचा फटका नागपूरकरांना बसत असून गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात नागपुरातील हजारो घर-दुकाने पाण्याखाली जात आहे. यात लोकांच्या घरातील धान्य, फर्चिनर, वाहने तसेच दुकानांत पाणी शिरल्यामुळे हजारोंचे नुकसान होत आहे.

त्यामुळे शहराच्या विकासाचे मास्टर प्लॅन तयार करावे आणि युद्धपातळीवर तज्ज्ञांची समिती स्थापन करुन पावसाळ्यातील पाण्याच्या निचाऱ्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोणातून उपाययोजना कराव्यात या मागणीला घेऊन नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेसतर्फे आमदार विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनात स्वाक्षरी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

या अंतर्गत आज शनिवारी सकाळी ओंकार नगर येथील स्वराजनगर उद्यानातून सुरुवात झाली. तसेच त्यानंतर काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गजानन नगर, वनराई नगर, स्वराज नगर, ओंकार नगर, जबलपुरे लेआऊट, दिवान लेआऊट आदी परिसर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात पिंजून काढले. प्रामुख्याने ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराळे, विश्वेश्वर अहीरकर, माजी नगरसेवक प्रवीण सांदेकर, भोला कुचनकर, विनोद नागदेवते, डॉ. सुधीर अघाव, आशीष कुंटावार, अशोक देवगिरकर, गजानन ठाकरे, विजय वानखेडे, उत्तम मेश्राम, अमन उखाडे, संगिता मौस्हकर, तृप्टी ढोके, ज्ञानेश्वर पांडे, रघुजी किंडरले, श्वेता मानकर, चक्रधर भोयर, राजेश जामदाडे, गजानन ठाकरे, किशोर जवाते, विजय गमने, अजय करांगळे यांच्यासह आदीची उपस्थिती होती. *मिसकॉल द्या, ऑनलाईन पिटीशन साईन करा* या स्वाक्षरी अभियानासाठी काँग्रेसने हायटेक पद्धत अंगीकारली असून या 07127191232 क्रमांकावर मिसकॉल देऊन किंवा या https://chng.it/LNvWH25gnb लिंकवर क्लिकरुन या मोहीमेत सहभागी होता येईल.

Related Post