Fri Nov 22 03:54:06 IST 2024
नागपूर : बहिणीच्या मनातील इच्छा पूर्ण करणाऱ्या भावाला आनंदाचा पेढा भरवून हातावर मायेचा धागा बांधून आभार व्यक्त करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन! महाराष्ट्रातल्या कोट्यवधी बहिणींना आर्थिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या भाजपा-महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांना राखी बांधून
यंदाचा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. कोराडी येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयातही शेकडो भगिनींनी औक्षण करण्यासाठी उपस्थित होत्या. लाडकी बहीण योजनेचा ३००० रुपयांचा पहिला हप्ता खात्यात जमा झाल्याने रक्षाबंधनापूर्वीच भावाने ओवाळणी दिल्याची भावना व्यक्त केली. श्री बावनकुळे यांच्या कोराडी येथील कार्यालयात भरलेल्या जनता दरबारात हा रक्षाबंधनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कामठी विधानसभा क्षेत्रातील येरखेडा येथील राजश्री घिवले व सरिता भोयर यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी श्री बावनकुळे यांना राखी बांधली व मिठाई भरविली. महायुती सरलकारने लाडकी बहिण योजनेचे लाभ खात्यात जमा झाला आहे. या राशीचा सदुपयोग आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी होईल असा विश्वास यावेळी भगिणींनी व्यक्त केला. नागपूर जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील योजनेसाठी पात्र असणारी भगिणी ?लाडकी बहिण? योजनेपासून वंचित राहू नये यासाठी भाजपा महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, त्यांचे अर्ज भरून द्यावेत तसेच दस्तावेजांच्या अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री बावनकुळे यांनी केले. यावेळी मूनमून यादव, आचल तिरपुडे, पोर्णिमा बर्वे, सुषमा तलमले, प्रिती देशमुख, सुषमा कळंबे, पायल तलमले, रेणू लेंडे, ज्योती काळे, आशिष वंजारी, राजकिरण बर्वे, गजानन तिरपुडे उपस्थित होते.
जनता दरबारात श्री बावनकुळे यांनी कामठी विधानसभा तसेच नागपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांची तसेच त्यांच्या अडचणींची माहिती जाणून घेतली. वैद्यकीय सहायता तसेच इतर कामांच्या समस्या त्यांनी तातडीने सोडविल्या. ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांच्या अडचणी संबंधित प्रशासनाकडून सोडवून देण्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला. लाडकी बहिण योजनेतून महिन्याला खात्यात पैसे जमा होणार असल्याने आर्थिक आधार मिळाला आहे. यातून त्यांच्या दैंनदिन जीवनातील लहान मोठ्या अडचणी दूर होतील, असे मूनमून यादव म्हणाले. लाडकी बहिण योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. विशेषत: कामगार व कष्टकरी महिलांसाठी ही योजना भविष्य सुरक्षित करणारी आहे, असे सारिका भोयर म्हणालात.