महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे साखळी उपोषण

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-08-20 21:02:58.0
img

नागपूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी, संविधान चौकात साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी साखळी उपोषणात असंख्य कंत्राटी कामगारांची उपस्थिती होती.

वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांची नेतृत्व करणारी संघटना आहे. सर्व पदाधिकारी, कंत्राटी अधिकारी, सर्व कामगारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पी ए शशांक दाभोळकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आणि विनंती केली की, आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री सोबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक मध्ये कंत्राटी कामगार यांचे कंत्राटदार मुक्त आणि शाश्वत रोजगार मिडावा ही विनंती केली. शशांक दाभोळकरांनी कंत्राटी कामगारांना आश्वासन देऊन निवेदन स्वीकारले.

जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्यास तर आम्ही येत्या 24 ऑगस्ट रोजी सर्व महाराष्ट्रभर सर्व कंत्राटी कामगार संघटना रेशीमबाग नागपूर पासून तर ऊर्जामंत्री यांच्या निवासस्थान पर्यंत पायी मोर्चा काढणार असे कंत्राटी कामगारांनी सांगितले. यासाठी २० ऑगस्ट रोजी, साखळी उपोषण राज्यभर सुरू असून नागपूरातील संविधान चौकात अध्यक्ष समिर हांडे, सचिव अभिजित माहूलकर, योगेश सायवानकर उपाध्यक्ष, सागर साबळे ( कार्याध्यक्ष),सुकेश गुर्वे(संगठनमंत्री) तसेच सभासद मुकेश पात्रिकर,मोनिका सोनी,प्रीति जाधव, जावेद ,गोपाल कुरील,तेसेच इतर कंत्राटी कामगार यांच्या नेतृत्वातील साखळी उपोषण करण्यात आले.

Related Post