Fri Apr 04 06:53:58 IST 2025
कामठी : कामठी नगर विकास कृती समिती च्या वतीने तहसील कार्यालयासमोर दहा दिवसापासून आमरण उपोषण करण्यात आले अनेक समस्यांचे निवारण महाराष्ट्र शासनाकडून करण्यात यावे याकरिता उपोषण करण्यात आले.
परंतु कामठी तालुका कर्तव्य दक्ष तहसीलदार जगदाळे यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर रास्त मागण्या महाराष्ट्र शासन यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
ताबडतोब माननीय जिल्हाधिकारी त्यांचे सोबत मीटिंग लावण्यात येईल असे आश्वासन आमरण उपोषण करते यांना देण्यात आले व त्यांचे उपोषण नारळ पाणी देऊन सोडवण्यात आले यावेळी उपस्थित सरपंच परिषद संघटना विदर्भ कार्याध्यक्ष बंडू कापसे व इतर नागरिक उपस्थित होते.