छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नटबोल्ट गंजले असल्याचे नौदलाला कळवले, सामाजिक बांधकाम विभागाचा दावा

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-08-27 23:06:36.0
img

'मुंबई : या पुतळ्याचे नटबोल्ट गंजले असून उपाययोजना करण्यात यावी, अशी सूचना आमच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी देण्यात आली होती असे सामाजिक बांधकाम विभागाने म्हटले आहे. 20 ऑगस्ट रोजीच पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सांगण्यात आले होते असे राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सामाजिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) दुपारी एक वाजताच्या सुमारास कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चौथरा 12 फुटांचा तर पुतळा 28 फूट उंच होता. तसंच पुतळ्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 44 लक्ष खर्च करण्यात आला होता अशी माहिती सामाजिक बांधकाम विभागाने दिली आहे. राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं? पुतळा कोणी बांधला होता आणि पुतळ्याचा दर्जा कसा होता? पुतळा बांधण्याचे निकष काय? आणि अभ्यासकांचं यावर काय म्हणणं आहे? जाणून घेऊया,

4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या पुतळ्याचे काम नौदलामार्फत झाल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. 26 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात छत्रपती शिवरायांचा हा पुतळा दुपारी 1 वाजताच्या सुमारास कोसळला. त्यावेळी तिथे कोणीही नव्हतं अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. ते म्हणाले, ?तिथे काही मोजकी घरे आहेत. त्या घरात राहणाऱ्यांनी ही माहिती सांगण्यास सुरुवात केली ही महाराजांचा पुतळा पडला आहे.? राजकोट येथे आपल्या कार्यालयात असताना भाई मांजरेकर यांना ही माहिती कळाली आणि ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी ही माहिती तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस अधीक्षक आणि मंत्रालयात कळवली असं ते सांगतात. भाई मांजरेकर यांनी सांगितलं की, ?मी त्यावेळी कार्यालयात होतो. त्या वेळी खूप पाऊस आणि वारा जोरात होता. तिथे काही घरं आहेत त्यातल्या लोकांनी सांगायला सुरुवात केली की पुतळा कोसळला आहे. "मी तत्काळ त्याठिकाणी पोहचलो. माझं कार्यालय तिथेच बाजूला आहे. मी शब्दातही सांगू शकत नाही अशी अवस्था होती. "मी लगेच पोलीस अधीक्षकांना मेसेजवर कळवलं, सार्वजनिक बांधकाम विभागात आणि मंत्रालयातही फोन केला. तोपर्यंत तिथे मोठ्या संख्येने लोक जमले होते,? असे भाई मांजरेकरांनी सांगितले. भाई मांजरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता अजित पाटील यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला या प्रकरणी पुतळ्याचे काम केलेल्या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Related Post