छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो : पंतप्रधान मोदी

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-08-30 21:15:39.0
img

पालघर : बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. तसेच सुमारे १ हजार ५६० कोटी रूपयांच्या २१८ मत्स्यपालन प्रकल्पांचेही उद्धाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे सिडको ग्राउंड येथे भूमिपूजन करण्यात आले. वाढवण बंदर प्रकल्प हा जागतिक दर्जाचा प्रकल्प आहे. या वाढवण बंदर प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे देखील उपस्थित होते.

माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आमचे संस्कार वेगळे आहेत. मी आज महाराष्ट्रात आल्यावर सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे. या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्या शिवप्रेमींचीही मी माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवताशिवाय काहीही मोठे नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. शिवरायांच्या चरणावर डोके ठेवून मी शिवराय आणि त्यांची पूजा करणाऱ्या शिवभक्तांची माफी मागतो. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी होता. पश्चाताप न होणाऱ्यांपैकी आम्ही नाही. काही जण सावरकर यांना नावे ठेवतात, त्यांनी माफी मागितली का? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी अकराला मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ?ग्लोबल फिनटेक फेस्ट?ला भेट दिली.

Related Post