Fri Apr 04 06:45:13 IST 2025
नागपूर : कामठी मौदा विधानसभा मतदारसंघात प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्याद्वारे आयोजित भव्य रोजगार मेळावा पार पडला. युवकांना आपल्या गावाच्या ठिकाणी हक्काचा रोजगार मिळावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे होते. या मेळाव्यात एकूण ६० नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला, ज्याद्वारे ८०० युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध झाले आहेत.
रोजगार मेळाव्यात सहभागी कंपन्यांनी युवकांच्या विविध पदांसाठी पदासाठी मुलाखती घेतल्या, आणि त्याच ठिकाणी लगेच नियुक्ती पत्र देवू केले. हजारो युवक या मेळाव्यात उत्साहात सहभागी झाले होते. ग्रामीण आणि नागरी भागातील युवकांना आपल्या घराजवळ हक्काचा रोजगार मिळावा, ज्यामुळे स्थलांतर कमी होईल आणि त्यांच्या कौशल्यांना योग्य संधी मिळेल या मुख्य उद्देश प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांचा होता. या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री लोकनेता मा. श्री. सुनीलजी केदार साहेब, रामटेक लोकसभेचे खासदार मा. श्री. श्यामकुमारजी बर्वे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात प्रामुख्याने माजी अध्यक्ष रश्मीताई बर्वे, पं. स. कामठी सभापती दिशाताई चनकापुरे, पं. स. मौदा सभापती उपसभापती दिलीपजी वंजारी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे शकुरजी नागानी, माजी नगराध्यक्ष शाहजाह खान, मनोजजी शर्मा, माजी नगराध्यक्ष निरज यादव, जि. प. सदस्य वृंदाताई नागपुरे, काँग्रेस कमिटी मौदा तालुका ज्ञानेश्र्वरजी वानखेडे, कृ. ऊ. बा. समिती मौदा सभापती राजेशजी ठवकर राजेंद्रजी लांडे नीरजजी यादव आशिषजीमल्लेवर सोनूताईकुथे रोशनजी खडसे सचिनजी मानवटकर रतनदीपजी रंगारी आकाशजी उके अर्चना मंडपे सुमेध मानवटकर अजय राऊत हरिभाऊ गडबईल कमलेश नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आम्ही या रोजगार मेळाव्याचे आयोजन केवळ युवकांना रोजगार देण्यासाठीच केले नाही, तर त्यांना त्यांच्या गावाच्या जवळ, आपल्या कुटुंबाच्या जवळ रोजगार देण्यासाठी केले. कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातील ८०० युवकांना रोजगार देऊ शकलो, याचा मला अत्यंत आनंद आहे. या कार्यक्रमाच्या यशासाठी आमच्या टीमने खूप मेहनत घेतली, आणि आम्ही भविष्यातही असे रोजगार मेळावे आयोजित करत राहू. जवळपास ६० कंपन्यांनी मेळाव्यामध्ये सहभाग घेतला होता, त्या सर्व सहभागी कंपन्यांचे मी आभार व्यक्त करते, अशी प्रतिक्रिया अवंतिका लेकुरवाळे यांनी दिली.