सा.बा.विभाग क्र.२ नागपूर अंतर्गत विविध कामे निकृष्ट, सचिवाला निवेदन

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-12-17 15:18:11.0
img

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ अंतर्गत करण्यात आलेली विविध विकासकामे ही निकृष्ट दर्जाची असल्याने आढळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांना तक्रार करण्यात आलेली आहे.

काही महिन्यापूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र धाबर्डे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ येथे माहिती अधिकार कायद्यानव्ये माहिती मागितली होती. पण, तेथील माहिती अधिकारी व कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी यांनी हेतुपुरस्सर वेळ मारून नेऊन माहिती दिली नाही. आणि स्वतःच अपील लावून स्वतःच्या बाजूने निर्णय दिला. त्यात माहिती देतानाच अर्जदाराची म्हणणे ऐकून घेतले नाही. आणि एकांगी स्वतःच्या बाजूने निर्णय दिला. त्याविरोधात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र धाबर्डे हे आज स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याबाबत निवेदन दिले आणि त्यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून दिली.

कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी यांच्यावर प्रशासकीय दिरंगाई प्रकरणी शिस्तभंगाची कारवाईची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

Related Post