इंदोरा चौक मेट्रो स्टेशन येथून आज पासून प्रवासी सेवा सुरु

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-12-20 19:25:22.0
img

नागपूर : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पानांतर्गत इंदोरा चौक मेट्रो स्टेशन आज पासून प्रवासी सेवा करता सुरु झाले असून पहिल्या प्रवाशांचे महा मेट्रो द्वारा स्वागत करण्यात आले. इंदोरा निवासी श्री. कुशल मेश्राम यांनी इंदोरा चौक मेट्रो स्टेशन येथून न्यू एयरपोर्ट

मेट्रो स्टेशन पर्यंत तिकीट घेत मेट्रोने प्रवास केला. महा मेट्रोचे महाव्यवस्थापक(ऑपरेशन) श्री. सुधाकर उराडे यांनी त्यांचे स्वागत केले. आता ३८ मेट्रो स्टेशन येथून सकाळी ६ ते रात्री १० वाजता पर्यंत मेट्रो सेवा सुरु असून या स्टेशवरुन प्रवासी सेवा सुरू झाल्याने आता या परिसरातील नागरिकांना दररोज मेट्रोने प्रवास करणे सोपे होणार आहे. उल्लेखनीय आहे कि आज इंदोरा चौक मेट्रो स्टेशन येथे खापरी मेट्रो स्टेशनच्या दिशेने जाणारी पहिली ट्रेन सायंकाळी ०६.०५ वाजता पासून पोहोचली तर आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनच्या दिशेने जाणारी पहिली ट्रेन सायंकाळी ०६. ०२ वाजता पोहोचली. इंदोरा रहिवासी श्री. कुशल मेश्राम यांनी सांगितले कि माझे राहणे या परिसरात असून मेट्रो स्टेशन सुरु झाल्याने अन्य ठिकाणी जाणे सोईस्कर होणार आहे. आज वर्तमान पत्राच्या माध्यमाने सदर स्टेशन सुरु होणार असल्याचे माहिती झाले. स्टेशन परिसरातील फूट-ओवर-ब्रिज मुळे स्टेशन परिसरात येणे आणखी सुविधाजनक होणार आहे. ? *दर १० मिनिटांनी मेट्रो सेवा :* सकाळी ६.०० वाजता पासून ते रात्री १०.०० वाजता पर्यंत दोन्ही मार्गिकेवरील मेट्रो सेवा (ऑरेंज लाईन : खापरी मेट्रो स्टेशन ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन) व (ऍक्वा लाईन : लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन) दर १० मिनिटांनी उपलब्ध असतील आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन येथून इंदोरा चौक मेट्रो स्टेशन हे तिसऱ्या क्रमांकाचे मेट्रो स्टेशन आहे.

इंदोरा चौक मेट्रो स्टेशन येथे उतरून प्रवासी सहजपणे पांचपावली,जरीपटका,कमाल चौक, आयनॉक्स, मेकोसाबाग परिसरात जाऊ शकतात. तसेच या परिसरात मार्केट,मॉल,शासकीय कार्यालय, तसेच मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या स्टेशनचा परिसरातील नागरिकांना निश्चितच लाभ होणार आहे.

Related Post