Fri Feb 21 15:16:48 IST 2025
Manmohan Singh Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं होतं.
अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण त्यांना यश आलं नाही. रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. मागील अनेक काळापासून ते आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते. याआधी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांना 8 वाजून 6 मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या होत्या. दुसरीकडे बेळगावमध्ये उद्या होणारी काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज रात्री बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.
1976 - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक. 1982 ते 1985 - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. 1985 ते 1987 ? भारताचा योजना आयोगाचे उपाध्यक्ष. 1990 ते 1991 - भारतीय पन्तप्रधानाचे आर्थिक सल्लागार. 1991 - नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री. 1991 ? आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. 1995 ? दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य 1996 - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक 1999 - दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण पराभव झाला 2001 ? तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता 2004 ? भारताचे पंतप्रधान 2009 - दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ