नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होण्याची शक्यता

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-01-02 22:14:47.0
img

Chandrashekhar Bawankule : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असल्याचे वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा करताना गडकरी यांनी अनावधानानेच पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या नावाचा उल्लेख केला.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा करताना गडकरी यांनी अनावधानानेच पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या नावाचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक रित्या पालकमंत्री पदांची घोषणा करण्याआधीच नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नागपूरच्या होणाऱ्या पालकमंत्र्यांचे नाव अप्रत्यक्षपणे जाहीर करून टाकल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं जाहीर झालेली नसल्याने महायुतीत पालकमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु असल्याचं बाेललं जात आहे. दरम्यान, महायुतीचे मंत्री पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, चढाओढ नसल्याचं सांगत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर आधी मुख्यमंत्री कोण होणार यावरून वेळ लागला नंतर शपथविधीही उशीराच झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंत्र्यांना खाती वाटप करतानाही बरीच वाट बघावी लागली. आता निकाल लागल्यानंतर साधारण दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असून राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नावांची घोषणा झालेली नाही.

Related Post