जिजाऊ बँके तर्फे खोडके दाम्पत्यांचा सत्कार

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-01-16 08:41:49.0
img

अमरावती : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटीव्ह बँके तर्फे खोडके दांपत्याचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटीव्ह बँकेमधे सावित्रीबाई फुले जयंती पासून जिजाऊ जयंती पर्यंत साजरा होणाऱ्या दशरात्रौत्सव महोत्सवानिमित्त अमरावती शहरात अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विजय संपादन केल्यामुळे खोडके दांपत्याचा जिजाऊ बँकेच्या मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुलभाताई खोडके यांनी अमरावती शहराला औद्योगिक, सांस्कृतिक आणि अंबादेवि मंदिर परीसर विकास,पर्यटन,शहराचा सर्वांगसुंदर विकास करणे, रोजगाराचा प्रश्न सोडविणे, विमानसेवा तात्काळ सुरू करणे, आयटी पार्क निर्मितीसाठी प्रयत्न करणे व शहराचाच नव्हे तर आदिवासी पर्यटन विकास करणे ही अमरावतीकरांनी विजयी केल्याने या कारकीर्दीत प्राथमिकता देण्यात येईल असे प्रतिपादन केले. आमदार खोडके यांनी अमरावतीच्या जनतेने त्यांचा सातत्यपूर्ण जनतेची संपर्क असल्याने त्यांची निवड केली याबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच नागरी सहकारी बँकांसमोरची आव्हाने अडचणी माहीत असल्याने तसेस कृषी निगडीत सर्वच व्यवसायांची आर्थिक स्थिती असल्याने , शासन स्तरावर एनपीए नाॅर्मस मधे सुसुत्रता आनण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. तसेच जिजाऊ बँकेच्या पारदर्शक शिस्तबद्ध कामामुळेच जनतेचा विश्वास बँकेने संपादन केल्याने 433कोटी ठेवी व 280कोटी कर्ज वाटप व 3 टक्केपेक्षा कमी एनपीए असल्याने बँकेला भविष्यातील प्रगतीलच्या शुभेच्छा दिल्या. जिजाऊ बँकेचे संस्थापकअध्यक्ष अविनाश कोठाळे व राजेन्द जाधव यांनी सर्वप्रथम बँकेच्या संचालक मंडळातर्फे स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ ,स्मृतीचीन्ह,देऊन खोडके दांपत्याचा सत्कार केला. ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन परिस्थितीत ऊभयतांनी शैक्षणिक सामाजीक सुधारणांसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजनांना विकसित करण्यासाठी वसा घेतला त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पती-पत्नी एकत्रितपणे राजकारणात राहून राजकीय समाजसेवेचे व्रत खोडके दाम्पत्यांनी जोपासले आणि फुले शाहु आंबेडकर विचारधारेशी नाळ जोडत शहराच्या विकासासाठी नागरिकां समवेत सदैव संपर्कात राहून ऊत्कृष्ठ नियोजनासह संजय खोडके अविरत कार्यरत असतात आणि सुलभाताई यांनी अमरावती शहराच्या विकासासाठी नागपूर अधिवेशनात विधान सभागृहात मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस व ऊपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समक्ष स्पष्ट निवडणुकपुर्वी निधीचे आश्वासनाची भूमिका कथन करूण विधानसभेत अमरावतीची बाजू प्रभावीपणे मांडली ही जमेची बाजू अमरावती शहराच्या विकासासाठी असल्याने ऊभयतांचा जिजाऊ बँक सत्कार करीत असल्याचे अध्यक्ष अविनाश कोठाळे म्हणाले. जिजाऊ बँकेचे आक्टोंबर 2025 पर्यंत रोप्य महोत्सवी वर्ष असल्याने बँक ऊद्योग वर्ष साजरे करीत असल्याने घर घर मे ऊद्योगांतर्गंत सरकारच्या रोजगारा संबंधात जिल्हा ऊद्योग केन्द्रातील विविध 200ऊद्योगांमधील 25ते35 टक्के सबसीडीच्या योजनांमधुन मिळणारा सबसीडीचा निधी नियमित वेळेवर मिळण्यास प्रयत्नरत राहण्यास खोडकेताई सक्षम असल्याचा आशावाद यानिमित्त व्यक्त केला व जिजाऊ बँकेने उभयतांचा यथोचित सत्कार करीत असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी राजेंद्र जाधव जिजाऊ बँक व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष यांनी प्रास्ताविकामध्ये सुलभाताईंचा जनसंपर्क आणि संजय खोडके यांची हातोटी काम करण्याचे कौशल्य लक्षात घेता अमरावतीच्या जनतेने कौल दिला व या विपरीत परिस्थितीत मत विभाजनामुळे आणि विशिष्ट वर्गाचे मते एकसंघ राहिल्याने विजयाची तिसऱ्यांदा संधी मिळाली त्यामुळे या संधीचे सोने अमरावती शहराचा औद्योगिक विकास करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. उद्योजकांना सहजतेने उद्योग करता यावा सर्व सुविधा मिळाव्यात हा दृष्टिकोन असल्याने संजय खोडके यांचा प्रशासकीय व राजकीय अनुभव निश्चितपणे अमरावतीकरांची स्वप्न साकार करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात 1000 कोटीच्या ऊद्दीष्टाची साध्यता करण्यासाठी युवा ऊद्योजकांना बँक प्राधान्य देईल व यश खोडकेंनी या निवडणुकीत केलेल्या परीश्रमाचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना संजय खोडके यांनी सांगितले कि,अमरावतीकरांनी आमचे खोडके कुटुंबावर नेहमीच प्रेम केलेले आहे तेव्हा अमरावतीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून सर्व स्तरातील नागरिकांनी चांगलीच मदत केल्याने व जनतेप्रती सदैव बांधिलकीची कृती असल्याने यश मिळाले. भविष्यात अमरावतीच्या विकासामध्ये अंबादेवी परीसराचा विकास, शहराचा औद्योगिक विकास, भुमीगत गटार योजनाआणि पर्यटन, आयटी पार्क निर्मिती तथा जिजाऊ चौकाप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज चौकाचे वैशिष्ठ्यपुर्ण आकर्षक सौदंर्यीकरण करण्यात येईल आणि अमरावती शहराचा सर्वांगीण विकासाचे तथा ईतवारा चौकातील फ्लायओव्हर दृतगतीने पुर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे अभिवचन दिले.

कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, संचालक बबन आवारे, संचालक श्रीकांत टेकाडे , नितीन डहाके, प्रशांत गावंडे, अरविंद गावंडे, पल्लवीताई बारब्दे, तज्ञ संचालक विजय जाधव व सुरेन्द्र दाळु, संचालक सुनिल चाफले,अनिल बुरघाटे,भैय्यासाहेब निचळ,आयईआयचे गणेश बारब्दे ,राम विघे, शिवराज टेकाडे, ईजी.अभय बारब्दे, विद्याधर ईंगोले,सुभाष जाधव,कोहळे,अविनाश पेठे,माजी नगरसेवक प्रशांत डवरे ,यशांजली क्न्ट्रक्शनचे प्रकाश राऊत इत्यादी गणमान्य सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखडे, बँकेचे अधिकारी तथा कर्मचारीवृंद हजर होते .कार्यक्रमाचे ऊत्कृष्ठ संचालन ऊप मुकाअ व निसर्ग संगित मैफील आयोजक हरीष नाशिरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक बबनराव आवारे यांनी करुण राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.संचालक श्रीकांत टेकाडे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना बारबुदे,वैकुंठ साळूंके,गणेशकडु,सचिन ठाकरे,ईत्यादी कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Related Post