Sat Apr 26 21:32:00 IST 2025
जम्मू-काश्मी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक जण हे पर्यटक होते. पर्यटकांना त्यांची नावं आणि धर्म विचारल्यानंत दहशतवाद्यांनी शिवीगाळ केली आणि अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने पहलगाममध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेत अनेक पर्यटक जखमीही झाले आहेत, अशी माहिती आहे. तर, दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. ते उद्या घटनास्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. . जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. धक्कादायक म्हणजे भारतीय जवानांवर नाही तर पर्यटकांवर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. यानंतर शाहही जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत.
मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यादरम्यान काही घोड्यांनाही गोळ्या लागल्या. सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम तीव्र केली आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, हा हल्ला दुपारी अडीचच्या सुमारास झाला. पहलगाममधील बैसरन मैदानावर 2-3 बंदूकधारी सैनिकी गणवेशात आले आणि त्यांनी घोडेस्वारीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. बैसरन व्हॅली हे पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथे फक्त घोड्याने किंवा पायीच जाता येते. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. गोळीबाराची घटना अशा वेळी घडली जेव्हा पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येतात.