भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला करण्याची शक्यता

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2025-04-24 19:26:34.0
img

नागपूर : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा बदला घेण्यासाठी भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला करू शकतो. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आज केंद्र सरकारने सर्व दल बैठक बोलाविली. या बैठकीत ही माहिती देण्याची शक्यता आहे.

पहलगाममध्ये पर्यटकांना टार्गेट करून दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता सरकारकडून पाकिस्तान विरोधात कडक पाऊले उचचली जात आहेत. या हल्ल्यातील तीन दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले. हेच नाही तर हल्ल्याचा कट देखील पाकिस्तानमध्ये रचला गेलाय. धर्म पाहून पर्यटकांवर गोळीबार करण्यात आल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झालीये. हल्ल्याचा संपूर्ण कट रचणारा देखील पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसलाय. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण लष्कर अलर्ट मोडवर आहे. तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक दिल्लीत झालीये. या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरकडे तातडीने रवाना झाले होते. अमित शहा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांची भेट घेतली. पाकिस्तान विरोधात लोकांमध्ये संतापाचे वातावरण असून दहशतवादाची किड मुळापासून काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.

भारताकडून उचलण्यात आलेल्या कडक पाऊलांनंतर पाकिस्तान संतापला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका निवेदनात भारताला कोणत्याही आक्रमणाला व्यापक प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले की, पाकिस्तान त्याच्या शेजाऱ्याच्या शत्रुत्वाच्या स्वभावामुळे नेहमीच सतर्क असतो. भारत बऱ्याच काळापासून सिंधू पाणी करारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. जर भारताने कोणतीही कारवाई केली तर पाकिस्तान प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असाही इशारा त्यांनी दिलाय. पुढे म्हणण्यात आले की, सिंधू पाणी करारात जागतिक बँक हमीदार आहे, जो भारताला एकतर्फी निर्णय घेण्याची परवानगी देत नाही. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा करार हा सर्वोच्च अजेंडा असेल. भारताने पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानने मोठा धसका घेतला आहे. यावेळी पुढे म्हणण्यात आले की, गेल्या सर्जिकल स्ट्राईक हल्ल्यात झालेल्या जखमा अजूनही विसरलो नाहीत, त्यांना तसेच उत्तर देऊ. सर्जिकल स्ट्राईकसारखी पाऊले उचलू नये.

Related Post