Sun Mar 15 16:53:02 IST 2026
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे (Revati Sule) यांचं लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी (Sarang Lakhani) यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न (Revati Sule Marriage) निश्चित झालं आहे. सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत माहिती दिली. सारंग अरुण लखानी नागपूरचे आहेत. त्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार आहे.
तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची सूत्रांचे माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिने प्रतिष्ठित London School of Economics मधून पदवी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.