Sun Nov 24 11:39:17 IST 2024
नागपूर : जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला आहे. ४ हजार ४२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नागपूर शहरात आज ३ हजार १८६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीण मध्ये १ हजार १५३ जण आढळले असून इतर जिल्हयातील ८९ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
६ जणांचा मृत्यू झाला असून एक रुग्ण हा इतर जिल्ह्यातील आहे. सद्या जिल्ह्यात एकुण १८ हजार ६७९ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.