Fri Nov 22 04:33:21 IST 2024
नागपूर : समाजाला परत देण्याच्या सततच्या प्रयत्नांमध्ये, चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये राष्ट्रीय अग्रेसर असलेल्या आकाश + बायजू'ज ने आज नागपुर शहरातील स्पॉट्स हाताने रंगवलेल्या वॉल आर्टने सुशोभित करून पर्यावरण जागृतीची जबाबदारी स्वीकारली. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) चा एक भाग म्हणून आकाश + बायजू'ज चे विद्यार्थी, प्राध्यापक, शाखा कर्मचारी यांनी लॉ कॉलेज,
लॉ कॉलेज स्क्वेअर, अमरावती रोड, नागपूर येथे ?सोशल वॉल पेंटिंग? मोहीम राबवली. या उपक्रमाचा उद्देश भिंतींवर संबंधित प्रतिमा आणि घोषणा चित्र रंगवून शहराच्या पर्यावरण आणि सामाजिक कल्याणासाठी योगदान देण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. आकाश + बायजू'ज च्या नागपुरातील दोन शाखांमधील सुमारे 200 विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्य आणि शाखा कर्मचाऱ्यांनी या भिंतींचे नूतनीकरण करून कला लोकांपर्यंत पोहोचवली आणि महत्त्वाच्या सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली.
या मोहिमेबद्दल बोलताना, श्री अमित सिंग राठोड, आकाश + बायजू'ज चे प्रादेशिक संचालक म्हणाले, ?प्रेक्षक अनेकदा सामाजिक कलेशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंधित असतात आणि काहीवेळा ते प्रभावितही होतात. नागपुरातील सर्वात लोकप्रिय आणि वर्दळीच्या चौकांवर पर्यावरण जागृतीशी संबंधित घोषवाक्य रंगवण्याचा आकाश + बायजू'ज हा उपक्रम आपल्या पर्यावरणाचा आदर, संरक्षण आणि जतन करण्याच्या आपल्या विश्वासाचे आणि जबाबदारीचे प्रतिबिंब आहे. शिवाय, शहराला एक उज्ज्वल आणि राहण्यासाठी चांगले ठिकाण बनवून समाजात बदल घडवून आणण्याची इच्छा असलेल्या तरुण मनांना एकत्र आणण्यासाठी ही मोहीम मदत करते.?