आर्थिक मदतीमुळे आदिवासींच्या तीन विद्यार्थ्यांना नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2024-05-16 14:55:50.0
img

नागपूर : आदिवासी समाजातील अत्यंत गरीब व होतकरु तीन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळूनही वेळेवर प्रवेश शुल्क भरण्यासाठी पैसे नव्हते गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द होऊ नये म्हणून सामाजिक जाणीवेतून दीड लाख रुपये तात्काळ जमा केल्यामुळे आदिवासी

विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होऊ शकला. अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना एकलव्य मॉडेल रिसीडेन्सी शाळेमधून उत्तम शिक्षण मिळत असून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेण्यात येत आहे. आपल्या परीश्रमाच्या बळावर आदिवासी समाजाची तीन विद्यार्थ्यांना नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. विद्यापीठाच्या प्रवेशासाठी 3 लाख 65 हजार रुपये फी असून त्यापैकी 1 लाख 40 हजार रुपये फी विद्यार्थ्यांना भरावी लागते. गरीब विद्यार्थ्यांना हे शुल्क भरणे शक्य नसल्यामुळे गोंडवाना ट्रायबल फाउंडेशनने पुढाकार घेतल्यामुळे लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेणे शक्य झाले आहे. यासाठी समाज कल्याण विभागाचे सेवा निवृत्त सहआयुक्त आर. ङि आत्राम, सेवा निवृत्त अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे व अधिक्षक अभियंता उज्वल धाबे यांनी तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयाची मदत केल्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्रवेश होऊ शकला. अनुसुचित जमातीतील कमलेश भगतीसिंह तुलावी, कल्याणी बलदेव कोटवार व खुशी रमेश वाडीवे या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची कॉमन लॉ ॲडमिशन 2024 अंतर्गत प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यांना आदिवासी विकास विभागाकडुन शिक्षण शुल्क मिळाल्यानंतरही स्वत: भरावयाची रक्कम भरु न शकल्यामुळे प्रवेश रद्द होणार होता. आदिवासी विभागातील अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी पुढाकार घेऊन गोंडवाना ट्रायबल फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून दिली. विद्यार्थ्यांचे पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे तसेच गोंडवाना ट्रायबल फाउंडेशनला सुध्दा तात्काळ मदत करणे शक्य नव्हते.

आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी सामाजिक जबाबदारी स्विकारुन दिलेल्या मदतीमुळे या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. आदिवासी होतकरु गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता मदत व्हावी यासाठी गोंडवाना ट्रायबल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. फाउंडेशन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी समाजाने पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी यासाठी फाउंडेशनचे सचिव डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी आवाहन केले आहे.

Related Post